आज ९ ऑगस्ट:जागतिक👳🏾‍♂️आदिवासी दिवस👳🏾‍♂️ – बडगुजर. इन

आज ९ ऑगस्ट:जागतिक👳🏾‍♂️आदिवासी दिवस👳🏾‍♂️.
जागतिक👳🏾‍♂️आदिवासी लोकांचा👳🏾‍♂️आंतरराष्ट्रीय दिवस डिसेंबर १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रथम उच्चारला, जो जागतिक आदिवासी लोकांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दशकात [१९९५-२००४]दरवर्षी साजरा केला जातो.
कृती आणि प्रतिष्ठेसाठी एक दशक: या थीमसह दुसरे आंतरराष्ट्रीय दशक घोषित केले. विविध राष्ट्रांतील लोकांना स्वदेशी लोकांवर UN चा संदेश पोहोचवण्यासाठी हा दिवस पाळण्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.स्थानिक लोकांची प्रशंसा आणि चांगली समज मिळविण्यासाठी क्रियाकलापांमध्ये शैक्षणिक मंच आणि वर्गातील क्रियाकलाप समाविष्ट असू शकतात.
संयुक्त राष्ट्रसंघाने या आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हक्क, अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी ‘सन १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते व ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस” साजरा करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. आदिवासी हे मूलनिवासी असून भारतात एकूण ४६१ जमाती आहेत.भारताच्या प्रत्येक राज्यात आदिवासी समाजाचे प्राबल्य असून आरक्षणामुळे हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होत आहे.आपल्या राज्यात भिल्ल,गोंड,वारली,कातकरी,माडिया,कोकणा,ठाकूर या जमाती आहेत.संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
आदिवासी समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज असून निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारा समाज आहे,असे असूनही जगात सर्वात जास्त शोषण हे आदिवासींचे झालेले आहे व आजही होत आहे.त्यांना मागासलेले,रानटी असे संबोधून त्यांना हिणवले जाते,त्यांना त्यांच्या अधिकारांपासून,हक्कांपासून वंचित ठेवले जाते.ही अशी परिस्थिति लक्षात घेऊन त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी १९१६ च्या दशकात अमेरिकेत तसेच विविध देशांमध्ये चळवळी सुरू झाल्या.
तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने १९८२ मध्ये ९ ऑगस्ट रोजी जिनिव्हामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले.यानंतर पुढील काही वर्षे जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा,विचारमंथन होत राहिले,पुढे संयुक्त राष्ट्राने १९९४ हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले.पण शेकडो वर्षांपासून हा समाज अन्याय सहन करत आला आहे.रानावनात राहणारा हा समाज शिक्षणापासून खूप दूर राहिला.परिणामी समाजात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढत गेले.शेती,शेठजीच्या वाड्या व वीटभट्टीवर मजूर म्हणून तो राबत राहिला.पिढ्या न पिढ्या हे असंच चालत राहिले.रोजगाराच्या शोधात कुटुंबाच्या आरोग्याकडेही त्याचे दुर्लक्ष झाले,त्यामुळे मुलांमध्ये कुपोषण व अन्य आजाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.
दरवर्षी आपल्या देशात लाखो कुपोषित बालके मृत्युमुखी पडतात. आरक्षणामुळे त्यांना शिक्षण व राजकिय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले. आज लोकसभा व विधानसभेत अनेक आदिवासी खासदार व आमदार आपण पाहतो, त्यापैकी अनेक जण मंत्रीपदेही भूषवत आहेत. पण समाजाच्या दुर्देवाने या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे एकविसावे शतक उजाडले तरी हा समाज आजही काळोख्या अंधारात चाचपडत आहे.

“उष:काल होता होता,काळ रात्र झाली,”असं म्हणायची पाळी या समाजावर आली आहे.गेली अनेक वर्षे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पण ज्या दिवशी या समाजातील निरक्षरता संपून आदिवासींची मुले शिक्षण,रोजगार,आरोग्य व उद्योगधंद्याच्या मुख्य प्रवाहात सामील होतील,तो दिवस खरा “जागतिक आदिवासी दिन”ठरेल.
🌹🌹🌹जागतिक आदिवासी सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
स्त्रोत:गुगल/इंटरनेट..
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.*

🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩🪩

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*