अर्थे येथील श्री. बन्सीलाल सखाराम बडगुजर, सौ. सुमनबाई बन्सीलाल बडगुजर यांचा नातू व श्री. उमेश बन्सीलाल बडगुजर, सौ. मीनाक्षी उमेश बडगुजर यांचा चिरंजीव परेश उमेश बडगुजर यांने सन २०२१ – २२ च्या जीपीएटी परीक्षेत ९९.९२, भारतात ४१ व्या नंबर मिळवून पास झाले. परेश हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात शिकत घेतले. आता त्याचे पुढील शिक्षणासाठी आय. आय. टी. काशी बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे एम. फार्मसी शिक्षण घेत आहे त्यांना किंवा प्रत्येक विद्यार्थीना ही परीक्षा पास झाले की भारत सरकारक डून दरमहा १२,४०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार हा भुनेश्वर येथे करण्यात आला होता. मुंबई ते भुवनेश्वर प्रवास विमानाने केला याचा खर्च हा सत्कार आयोजित असलेल्या संस्थेने केला. शिरपूर आर.सी. पटेल कॉलेजमध्ये ही त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचे कौतुक हे अर्थे व शिरपुर पंचक्रोशीत होत असून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव ही होत आहे. आप्तेष्ट व त्यांचे मित्र यांनीही त्याचे अभिनंदन केले. परीक्षा अत्यंत कठीण असून संपूर्ण भारत देशातून परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी प्रमाणात असते. जीपॅट परीक्षेत उत्तम गुण किंवा रँक मिळवणे म्हणजे मानाचे तसेच उच्च बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एम.फार्मसी तसेच इतर मास्टर इन फार्मसी कोर्सेस शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. भारतात काही विद्यापीठ परीक्षा विद्यार्थ्यांना पीएचडीच्या शिक्षणासाठी थेट प्रवेश देत असतात.
चि. परेश उमेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹












Leave a Reply