आज ३० जुलै:आंतरराष्ट्रीय 🤝मैत्री🤝दिवस🤝 – प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे

आज ३० जुलै:आंतरराष्ट्रीय 🤝मैत्री🤝दिवस.🤝
🤝FRIENDSHIP DAY🤝
भाग👇३.
🤝↕️🤝
तमाम दोस्तों कों आज फ्रेंडशिप डे के अवसरपर हमारे अपने ज़माने के ‘गीत’
दोस्ती कैसी होती हैं?
ये आप निम्न १६ गीत सुनकर जानिए!

“खास दोस्तोंकों खास नज़राना”
🤝मैत्री🤝दोस्ती🤝 फ्रेंडशिप🤝काय असते❓
🎼खालि़ल🎼१६🎼गीत🎼आपणास सांगतील🎼*


1. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे :

2. तेरे जैसा यार कहां :

3. सलामत रहे दोस्ताना हमारा :

4. यारी है इमान मेरा :

5. आया मौसम दोस्ती का :

6. यारों दोस्ती बड़ी ही हसीन है :

7. दिल चाहता है :

8. अल्लाह वारियां :

9. सूरज डुबा है यारो :

10. हर एक फ्रेंड कमीना होता है :

11. तेरा यार हूँ मैं :

12. तेरी मेरी यारियां :

13. झिंदगी झिंदगी :


————————
🎀🤝 मैत्रीरंग 🤝🎀 संकलनःप्रा.सी.डी.साळुंखे,धुळे
🤝↕️🤝
वय कितीही होवो, शेवटच्या श्वासापर्यंत– ” खोडकरपणा “जिवंत ठेवणारं नातं एकच असतं ते म्हणजे– मैत्रीचं …

वाळवंटासारख्या रुक्ष जीवनातही “हिरवळीचा ओयासिस” फुलवणारं नातं एकच असतं ते म्हणजे– मैत्रीचं …

मनांतील कोणतीही नाजूक “सल” ज्याच्यापुढे उघडी करावी असे विश्वासाचं नातं एकच असतं ते म्हणजे — मैत्रीचं …

आपल्याला झालेला प्रचंड आनंद — प्रथम ज्याच्याबरोबर शेअर करुन जल्लोष करावा असे वाटते असं नातं एकच असतं ते म्हणजे — मैत्रीचं …

कळत-नकळत आयुष्यात घडून गेलेल्या “अक्षम्य चुका” फक्त आणि फक्त ज्याच्यापुढे मान्य करता येतात असं Confession Box सारखं नातं एकच असतं ते म्हणजे — मैत्रीचं …
म्हणूनच …

“मित्र” नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा , कारण जीवनांतील अर्धा गोडवा हा मित्रांच्यामुळे असतो …
नाते किती जुने आहे यावर मैत्री कधी टिकत नसते तर मैत्री टिकण्यासाठी ती खोल रुजावी लागते …
मैत्री ही कुठेही विकत मिळत नसून ती आपल्या मनातील ऋणानुबंधातून निर्माण होत असते …!!!
•———🤝———•
जिसके साथ खून का सम्बन्ध नहीं होता, फिर भी प्रिय लगे..
वह है👬दोस्त👬
जिसके साथ दुनियां भर की बातेंa करके भी थकान ना लगे ….
वह है🤝दोस्त👬
जिसके साथ छोटी सी बात पर भी खुल कर हंस लेते हैं…
वह है👬दोस्त👬
जिसके कंधे पर माथा रख कर रो सकते हैं ….
वह है👬दोस्त👬
जिसके साथ ठंडी चाय भी एक दम गरम लगे ….
वह है👬दोस्त👬
जिसके साथ खिचड़ी भी खाने में दावत जैसी लगे….
वह है👬दोस्त👬
जिसको आधी रात को भी उठा कर दिल की बात कर सके….
वह है👬दोस्त👬
जिसके साथ बिताए गए पलों को याद करने भर से, चहरे पर मुस्कान आ जाए…….
वह है👬दोस्त👬
जिसके साथ कोई भूमिका बनाए बिना खुल कर बात करें और वह स्वीकार करे …..
वह है👬दोस्त👬
एक अरसे के बाद भी जिसको मिलते ही दिल झूमउठे….
वह है👬दोस्त👬 दूर रहते हुए भी जिसके साथ दिल के तार जुड़े हो…..
वह है👬दोस्त👬 दोस्ती वो है मेरे दोस्त जो बेजान जिंदगी में भी जान डाल दे
वह है👬दोस्त👬
संक्षेप में दोस्त वो है जो हर मुसीबत में हर तरह से साथ निभाये
सभी दोस्तों को समर्पित
🤝👬🤝👬🏻🤝👫🏻🤝🐊मित्र दोस्त सखा FRIEND l
मैत्रीत कधीच नसतो END||
———————–
🤝मित्र🤝
केव्हाही येतात,
केव्हाही जातात.
मनाची दारं सताड,
उघडीचं टाकतात.

आपल्या सुखात,
खळखळून हसतात.
आपल्या दुःखात,
पिळवटून रडतात.

रक्ताच्या नात्याचे नसतात,
अग्निसमक्ष जोडलेले नसतात.
तरीही हे मित्र,
अद्वैत साधतात !

अवचित हळव्या एक क्षणी,
मनाच्या ,गाभाऱ्यात शिरतात.
आणी तिथेच कायमचे,
ठाण मांडून बसतात!!

सारे माझे, तयांना ठाऊक असते,
सारे तयांचे, मला ठाऊक असते.
म्हणूनच हे ” मैत्र,”
जपायचे असते !!

तारुण्यातिल, सलज्ज कुजबुज,
प्रौढपणातिल, भैरविचे हितगुज,
मित्रांसमवेतच, वायचे असतात !
म्हणून हे मित्र जपायचे असतात ! !
…..मित्र जपायचेच् असतात !!!
———————– मैत्रिदिनासारखाच..!
मैत्रिदिनासारखाच असावा
एक कुटूंब दिन
ज्यादिवशी सर्व कुटुंबीयांनी
सोबत बसावं
मनमोकळा संवाद करत
खळखळून हसावं

मैत्रिदिनासारखाच असावा
एखादा भाऊबंध दिन
त्या दिवशी सर्व भावांनी
एकत्रीत जमावं
मनात दडलेल्या विखाराला
दूर पळवून लावावं

मैत्रिदिनासारखाच असावा
एक नातेवाईक दिन
त्या दिवशी सर्व आप्तेष्टांनी
सहभोजन घ्यावं
मत्सरांच्या जळमटांच जाळं
मनातून काढून टाकावं

पण हे सर्व करण्यासाठी
अमूकच एका दिवसाचं
निमित्त का असावं?
वर्ष्यातल्या सर्वच दिवशी
साफ निर्मळ मनानं
आनंदी होत जगावं.
———————–
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता,त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते.साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते.साय म्हणजे गुलामी नव्हे.सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही मैत्री तशी असावी.दुधापेक्षा स्निग्ध.सायीची,नंतरची सगळी स्थित्यंतरे-दही,ताक,लोणी,तूपसारे जास्त जास्त पौष्टिकच असतात #तसं मैत्रीचं घडावं.!

मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्षबिंदू ठरावाll

आज मित्रता दिवस ज्यांच्याशी कधी गाठभेट नाही झाली पण या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सारख्या जेष्ठ, श्रेष्ठ,ज्ञानवंत,संत,साधू जणांशी भावबंध जुळले अशा सर्व स्नेहास मैत्रीस (मित्रता) दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🎊🎊🎊🎊🎊🎊
ज्ञानेश्वरीत पसायदानात माऊली ज्ञानोबा ‘मैत्रीचा’ उल्लेख करतात.
मैत्री एक सुंदर अशी व्याख्या ‘प्रेमाची, ती तुझ्या-माझ्यात, चार-चौघात किंवा एका विशिष्ट समुदाय अथवा प्रकारांत सीमित न राहता संपूर्ण वैश्विक व्हावी या करिता विश्वप्रार्थनेत दुसर्‍या चरणांत ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ॥ अशी उद्घोषणा करतात.
इथे ज्ञानराजांच्या या वैश्विक प्रार्थनेतील ‘मैत्री’ पण संकुचित न राहता व्यापक अर्थ धारण करते.
हिन्दी भाषेत मित्र या शब्दाला ‘दोस्त’ हा शब्द दिला आहे. याची सुंदर फोड करता येईल ‘ज्यांचे मन-विचार एकमेकांशी जुळले, जिथे माझे–तुझे हा भाव समूळ संपुष्टात आला ती ‘मैत्री’ आणि हे सर्व स्थिर झाले की तिथे परस्परांसंबंधींचे सर्व दोष लोप पावतात.
माऊली पण इथे हेच प्रतिपादित करतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ त्याच्या सर्व दोषांत्मक विचारांचा अस्त व्हावा. आणि जिथे दोषांचा अस्त झाला तिथे आपसूकच सत्कर्म वाढीस लागते. मग त्या मनुष्यासाठी त्या मानसिकतेसाठी सर्व विश्वच ‘मैत्रीपूर्ण’ बनते.

हे विश्वची माझे घर ! हे तेव्हांच शक्य आहे जेंव्हा आमची मैत्रीची व्याख्या ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या विश्वात्मक प्रकारांत येईल. मैत्री ही कुठल्याही दिवसापुरती किंवा संस्कृतीविषयी मर्यादित नाही. पण जेव्हां तिचा उल्लेख येईल तेव्हां आमच्या संत /महापुरुषानी केलेला तिचा व्यापक आणि सार्वभौम अर्थ निदान आम्हाला तर माहीत हवा.

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
शेवटपर्यंत आवश्य वाचा..

1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..

2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..

3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..

4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..

5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..

6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..

7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..

8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..

9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..

10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..

11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..

12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..

13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..

14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..

15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..

16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..

17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..

18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..

19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..

खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.. असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..

तेव्हा मित्रांनो..!!
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..

मैत्रीत…
ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
फक्त जीव लावायचा असतो.
मित्रांच लाडकं व्हायचं असतं…!
ll🌹🙏🏻शुभम् भवतु🙏🏻🌹ll
———————–
मैत्री कशी असावी?????
मैत्री सन्मानित करणारी असावी, अवमानित करणारी नसावी
मैत्री प्रेरणा देणारी असावी, वेदना देणारी नसावी
मैत्री वेळ देणारी असावी, घाव देणारी नसावी
मैत्री साथ देणारी असावी, स्वार्थ पाहणारी नसावी
मैत्री सुखावणारी असावी, मन दुखावणारी नसावी
मैत्री बदल घडवणारी असावी, बदला घेणारी नसावी
मैत्री समज देणारी असावी, गैरसमज वाढवणारी नसावी
मैत्री कौतुकास्पद असावी, संशयास्पद नसावी
मैत्री विश्वासनिय असावी, गैरविश्वसनिय नसावी
मैत्री खोडकर असावी, बंडखोर नसावी
मैत्रीत वाद असावा, राग नसावा
मैत्रीत परखडपणा असावा, परकेपणा नसावा
मैत्रीत प्रमाणिक पणाला वाव असावा, अविर्भाव नसावा
मैत्रीत उपकार असावा, अहंकार नसावा
मैत्रीत मोकळीस असावी, देखरेख नसावी
मैत्रीत मर्यादा असावी, बांधील की नसावी
मैत्रीत परीचय असावा, संशय नसावा
मैत्रीत चिडवणे असावे, फसवणे नसावे
मैत्रीत रुसणे असावे, मैत्रीत ऊसणे नसावे
मैत्रीत विचारपूस असावी, चौकशी नसावी
मैत्रीत तृष्णा असावी, वासना नसावी
मैत्रीत ओढ असावी, नको ती खोड नसावी
मैत्री समाधानकारक असावी, बंधनकारक नसावी
मैत्री उपाय कारक असावी, अपायकारक नसावी
मैत्री असे शब्दांना जाग, भासे आठवणी चा भाग.
मैत्री म्हणजे तात्पुरता सहवास नसावा, आयुष्यभराचा प्रवास असावा.
मैत्रीमुळे जीवनाला अर्थ, मैत्रीविना सारे काही व्यर्थ.
जागतिक मैत्री दिनाच्या सर्व मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा.🌹
———————–

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*