आज २९ जुलै:भारतरत्न जेआरडी टाटा यांची ११९ वी जयंती.
🌹↕️🌹
भारतीय विमान वाहतुकीचे जनक जेआरडी टाटा याचे नांव देशाच्या व्यावसायिकांच्या यादीत अग्रस्थानी असून ते केवळ व्यवसाय नाही,तर निती मूल्यांच्या निकषांवरही टाटा हे नाव आजच्या घडीला ही झळाळत आहे.टाटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साधी रहाणी,जमिनीवर असणारे पाय आणि कोणतंही काम लहान न समजण्याची वृत्ती.
भारत स्वतंत्र देश म्हणून कार्यरत झाला आणि इथल्या व्यापार उदीमानं नवीन दृष्टीकोन बाळगत नवी भरारी घेतली.अनेक व्यवसाय नव्यानं सुरू झाले,रुजू लागले.
देशाच्या प्रगतीसाठी अशा कष्टाळू आणि दूरदृष्टी असणार्या व्यावसायिकांची फळी उभी रहाणं फ़ार गरजेचं होतं.या फळीपैकी एक नाव म्हणजे,टाटा. आजच टाटांच्या बाबतीत बोलायचं तर.. सिर्फ “नाम ही काफ़ी है”!_
कपड्यांपासून लाखो करोडोंच्या घर,दागिने, गाड्यांपर्यंत टाटांचा शिक्का असणारी कोणतीही गोष्ट ग्राहक विश्वासाने घेतात,यात आपली फसवणूक होणार नाही ही खात्री त्यांना असते. मात्र हा विश्वास,ही खात्री एका रात्रीत तयार झालेली नाही,यामागे आहेत टाटांचे परिश्रम आणि त्यांचं जमिनीवर टिकून असणं.इथल्या सामान्य माणसापासून आणि कंपनीत काम करणार्या सामान्य कर्मचार्यापासून टाटांनी स्वत:ला वेगळं कधीच मानलं नाही,वेळ पडली तर अगदी पडेल ते काम केल्यानं आणि त्याचा गाजावाजा न करता आपलं काम शांतपणे करून टाकल्यानं टाटा या नावाचा एक आदरयुक्त दबदबा निर्माण झालेला आहे.
जे आर डी टाटा(जहांगीर रतनजीभाई टाटा)यांना टाटा उद्योगसमूहातील सर्वात यशस्वी चेअरमन मानलं जातं.जेआरडी यांनी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी,१९३८ साली टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा भार स्वीकारला. हे पद त्यांनी १९९१ पर्यंत भूषविलं आणि केवळ कंपनीलाच नव्हे,तर देशालाही प्रगतीपथावर नेलं.
जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ सालचा.ते ५३ वर्षं टाटा सन्सचे चेअरमन होते. टाटा ग्रुपचे सर्वात जास्त यशस्वी चेअरमन म्हणून त्यांना आजही ओळखले जाते.
देशातील ते एकमेव असे व्यावसायिक आहेत ज्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लाभला आहे. १९९२ साली त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.जहांगिर यांचं बालपण फ़्रान्समधे गेलं.याचं कारण त्यांच्या मातोश्री फ़्रान्सच्या होत्या (भारतातील कार चालविणारी पहिली महिला म्हणून त्यांची नोंद आहे.
फ़्रान्समधील वास्तव्यातच त्यांना एअरक्राफ़्टमधे रुची निर्मान झाली,वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी वैमानिक बनण्याचा निश्चय केला. मुंबईत पहिला फ़्लाईंग क्लब सुरू झाला त्यावेळेस त्यांना पायलटचं लायसन्स मिळालं.
टाटा एअरलाईन्स या नावानं ही कंपनी चालू झाली. भारतातील ही पहिली विमान सेवा कंपनी होती जी पुढे जाऊन भारत सरकारनं अधिग्रहण केली.याच कंपनीला आज आपण एअर इंडिया म्हणून ओळखतो.
एअर इंडियाच्या सुरवातीच्या काळातला जे आरडींचा एक किस्सा लोकप्रिय आहे. एकदा जे.आर.डी टाटा एअर इंडियामधून प्रवास करत होते,त्यांच्या बाजूलाच आरबीआयचे पूर्व गव्हर्नर एल के झा बसले होते.अचानक जेआरडी मधून उठून गेले ते बराच वेळ आलेच नाहीत.साधारण तासाभरानंतर ते परतले.झा यांनी त्यांना विचारलं की इतका वेळ ते कुठे गेले होते? यावर जेआरडींनी सांगितलं,की ते विमानातील टॉयलेट स्वच्छ आहेत की नाही? हे बघायला गेले होते,यावर झा यांनी विचारलं की नुसती पहाणी करायला एक तास का? तर जेआरडी उत्तरले की,टॉयलेट पेपर ठिक लागला नव्हता तो व्यवस्थित लावून आलो.
या प्रवासानंतर जेआरडी टाटा इंडियन एअरलाईन्सच्या प्रत्येक बोइंग विमानातील टॉयलेटमधे जाऊन त्याची तपासणी केली.जिथे कुठे त्यांना त्रुटी दिसल्या त्या सुधारण्यासाठी सूचना देत न बसता त्यांनी त्या स्वत: सुधारल्या.
प्रवाशांचा विमानप्रवास सुखकरव्हावा यात कसलीही उणीव,कमतरता रहाता कामा नये याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.प्रत्येक प्रवासानंतर ते विमान कर्मचार्यांच्या कौतुकाचे आणि सेवेतील सुधारणांबाबतचे मत असणारी चिठ्ठी देऊन जात,त्यांच्या या सतत उणीवा शोधून त्या दूर करण्याच्या सवयीचा कर्मचार्यांना कधीच जाच झाला नाही कारण ते केवळ हुकूम सोडणारे बॉस नव्हते तर कर्मचार्यांच्या बरोबरीनं काम करणारे मालक होते,म्हणूनच टाटा हे एक आदर्श वर्क कल्चर म्हणून नावारुपाला आले आहे.
जीवनप्रवास: जे.आर.डी. टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला.उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते.
👉 सुझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या.रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते.
👉 ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९ मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती.जे.आर.डी.टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.
👉 टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला.यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,टाटा मोटर्स,टायटन इंडस्ट्रीज,टाटा टी,व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे.
👉 फ्रान्स,लंडन,जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले.१९२५ मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी ॲप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.
👉 १९३८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील,रसायने,ऊर्जा,वीज,अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता.
👉 त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला.उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला._
👉 टाटा म्हणजे विश्वासार्हता,हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे.त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली.
👉 ८८ व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते.
👉 त्यांच्याच मार्गदर्शना- खाली १९४१ मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार,संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले.
👉 १९३६ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,१९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली.१९४५ मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली.
👉 १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली.‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते.देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते.
👉 त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
👉 दरम्यान,देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते.या महान उद्योजकाचा १९९३ मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हा मध्ये मृत्यू झाला.
देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने लक्ष घालणाऱ्या जे.आर.डी.टाटा यांना ११९ व्या जयंती निमित्ताने मानाचा मुजरा
स्तोत्र:गुगल/इंटरनेट.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply