आज २८ जुलै:जागतिक निसर्ग संवर्धन दिन – बडगुजर. इन

आज २८ जुलै:जागतिक निसर्ग संवर्धन दिन.
करा वृक्षराजाचे संवर्धनl
होईल मानव-पशूपक्षी संरक्षणll

चांगले पर्यावरण आणि निरोगी मानवी समाजासाठी जगभर “जागतिक निसर्ग संवर्धन दिन” साजरा केला जातो.पृथ्वीच्या पर्यावरणातून नामशेष होत असलेली वृक्ष आणि प्राण्यांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

पाणी,वायु,माती,उर्जा,वनस्पती,खनिज,जीवजंतु यासारख्या निसर्गातील विविध घटकांचे संरक्षण करुन निसर्गाची सुंदरता अबाधित राखणे हे निसर्ग संवर्धन दिनाचे प्रमुख महत्त्व आहे.
प्रसिद्ध रुस लेखक लियो टॉलस्टॉय उघ्दृत यांनी असे म्हटले आहे की,माणूस आणि निसर्गामध्ये असलेली साखळी कधीच तोडू नये ही आनंद मिळवण्यासाठीची पहिली अट आहे.एक उत्तम पर्यावरण एक स्थिर आणि उत्पादक समाजाला मिळालेली देणगी आहे. वर्तमान आणि भविष्यात पुढच्या पिढीचे आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी निसर्गाचे संवर्धन,त्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे,जनजागृती करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग,विविध आजार,वातावरणीय बदल,प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्या जवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चला तर करू या निसर्ग संवर्धन l
सुसह्य करू या सर्वांचे जीवन ll
ll🌹🙏शुभम् भवतु:🙏🌹ll
स्तोत्र:गुगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे, धुळे.
🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*