केंद्रातील ओबीसीसाठी राज्य शासनाकडून अनुकूल अहवाल पाठविण्याबाबत पाठपुरावा करणार – श्री. धर्मेंद्र पोपट बडगुजर, शिरपूर

          *महासमितीच्या शिष्टमंडळाची चर्चा :*

          केंद्रातील ओबीसीसाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्र शासनाकडून अहवाल मागितला असून बडगुजर समाजाला ओबीसी मिळण्याच्यादृष्टीने अनुकूल अहवाल पाठविण्याबाबत सकारात्मक पाठपुरावा करू, असा संवाद अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या प्रतिनिधींशी मंत्रालयातील तत्कालीन कक्ष अधिकारी सौ. स्नेहल अभिषेक बडगुजर यांनी साधला.

पिछडा आयोगाकडून प्राप्त झालेले पत्र

          सौ. स्नेहल बडगुजर हे अडीच वर्ष मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची चांदवड येथे बीडीओ वर्ग-१ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या श्री रविंद्र पंडित बडगुजर यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

          महाराष्ट्र शासनाने बडगुजर समाजाला ओबीसीचे आरक्षण दि. २५ जून २००८ रोजी लागू केले. तेव्हापासून केंद्रातही ओबीसीचे आरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी मा. अहिर साहेबांची नियुक्ती झाल्याने या प्रकरणाला चालना मिळाली आहे.

          त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून दिल्लीच्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्र शासनाकडून बडगुजर समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत अहवाल मागितला आहे. सन २००६ मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने बडगुजर समाजाच्या स्थितीबद्दल पाहणी केली होती. हा पाहणी अहवाल बडगुजर समाजाची  सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती अधोरेखित करतो.

          महाराष्ट्र शासनाचा हा अहवाल सकारात्मक असल्यास बडगुजर समाजाला ओबीसी मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीला आहे. यासंदर्भात महासमिती दिल्ली दरबारी प्रयत्न करणार आहे.

          यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री आनंदा धोंडू सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने बडगुजर समाजाची स्थिती स्पष्ट करणारे दस्तऐवजही मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. यावेळी महासमितीचे सचिव प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर, संघटक श्री सुधीर तुळशीराम बडगुजर, ओबीसी समिती प्रमुख श्री धर्मेंद्र पोपट बडगुजर, उपप्रमुख श्री रविंद्र पंडित बडगुजर, श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर, श्री अनिल जगन्नाथ बडगुजर, श्री गणेश आनंदा बुडगुजर व सौ. उषाबाई रवींद्र बडगुजर उपस्थित होते.

1 Comment

Leave a Reply to Vilasrao Badgujar Sir, Shirpur Cancel reply

Your email address will not be published.


*