आज २५ जुलै:सन २००७ साली भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान – बडगुजर. इन

आज २५ जुलै:सन २००७ साली भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान.
↕️↕️↕️
प्रतिभा देवीसिंह पाटील जन्म१९डिसेंबर १९३४(हयात) त्या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या,पण पहिल्या महिला राष्ट्रपती २५ जुलै २००७ ते २०१२ पर्यंत राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती.भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
भारताच्या १२व्या राष्ट्रपती कार्यकाळ
{२५ जुलै २००७ ते २४,जुलै २०१२.}
पंतप्रधान: मनमोहन सिंग
उपराष्ट्रपती: हमीद अन्सारी
आधीचे राष्ट्रपती: डॉ.अब्दुल कलाम.
पुढील: प्रणव मुखर्जी.
राजस्थानच्या राज्यपाल म्हणून कार्यकाळ: ८,नोव्हें.२००४–२३,जुलै२००७
जन्म: १९ डिसेंबर, १९३४),नाडगाव,ता.मुक्ताईनगर (एदलाबाद). जि.जळगाव,महाराष्ट्र
राजकीय पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती: देवीसिंह राजसिंह पाटील
धर्म: हिंदू राजपूत
प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या.राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स.१९६२ ते इ.स.१९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
राजकीय जीवन: १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभा पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद)चे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले. नंतर पाटील या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या.प्रतिभा पाटील राजस्थानच्या गव्हर्नर होत्या.
२५ जुलै २००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली,त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.
सन १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी.महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली.
७ जुलै १९६५ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या.त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या.आरोग्य,पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण,समाजकल्याण व सांस्कृतिक,सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन,शिक्षण, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे.१९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
सन १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या.तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या.१९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या.१९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद)मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.
नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद,अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले,त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.पाळणाघर मदत योजना स्थापन केली.महिला बँकांची स्थापना केली.आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ,अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले.अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले.जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.
व्यक्तिगत परिचय: प्रतिभा पाटील(शेखावत)यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला.त्यांनी एम.जे. कॉलेज,जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी.ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.

राजकीय जीवनातील-महत्त्वाचे टप्पे:
१९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार.

१९६७ ते ७२:आरोग्य, पर्यटन,गृहनिर्माण,संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री.

१९७२ ते ७४: समाजकल्याण मंत्री.

१९७४ ते ७५:आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री.

१९७५ ते ७८:शिक्षण, सांस्कृतिक,पुनर्वसन मंत्री.

१९७९ ते फेबुवारी १९८०: विधानसभेत विरोधी पक्षनेत्या.

१९८२ते८५:शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री.

१९८३ ते ८५:नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री.

१९८५ ते ९०:राज्यसभेवर निवड.

१९८८ ते ९०:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष.

१८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हेंबर १९८८:राज्यसभेच्या उपसभापती.

१९९१:लोकसभेच्या खासदार.

८नोव्हेंबर२००४:राजस्थानच्या राज्यपाल.
कौटुंबिक पार्श्वभूमी:प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ.देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या,त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता._
स्तोत्र:गुगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*