२२ जुलै👇महत्वाच्या घटना -बडगुजर. इन

🪩 दिन विशेष: भाग-१- 🪩
२२ जुलै👇महत्वाच्या घटना

१९०८: देशाचे दुर्दैव म्हणजे जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या.हॉटसन वाचला.

१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

१९४६: इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला,त्यात ९० ठार.

१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

१९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.

१९४७: राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

  *२२ जुलै👇जन्म.*

१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.

१८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म.(मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)

१९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म.(मृत्यू:११डिसेंबर२०००)

१९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू:२७ ऑगस्ट१९७६).

१९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.

१९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

१९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.

  *२२ जुलै👇मृत्यू.*

१५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.

१८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.

१९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन. (जन्म:२डिसेंबर१८९८)

१९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग.ल.ठोकळ यांचे निधन.

१९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
स्तोत्र:गुगल/इंटरनेट..
🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*