इ. १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तथा शिक्षक सेवापूर्ती सोहळा – डॉ.राहुल साळुंखे,चोपडा

📚शैक्षणिक उपक्रम📚

चोपडा: येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळाची “सर्व साधारण सभा” दि.१६/७/२०२३ रोजी कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली व तद्नंतर जेष्ठ नागरिक संघ कार्यालयात,संस्था शिक्षक सेवापूर्ती,इ.१० वीचे गुणवंत विद्यार्थी तसेंच १२ वीत उज्वल यशा नंतरच्या स्पर्धा परिक्षांमधे विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्रिवेणी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील होते, सोबत संस्था उपाध्यक्ष बापूसाहेब सोमनाथ डोभा बडगुजर,सचिव अण्णासाहेब विजय हिरालाल करोडपती सर व कार्यकारिणी संचालक, सभासद,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,संस्था कार्यकारिणीवर डॉ.अशोकदादा पाटील व डॉ. दिपक(साई)पाटील यांची संचालक म्हणून निवडीप्रित्यर्थ यथोचित सत्कार करण्यात आला.
कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.व्ही.बाविस्करसर यांचे सेवापूर्तीप्रित्यर्थ सपत्नीक हृद्य सत्कार करण्यात आला.
तद्नंतर १२ वी परिक्षेतील यशा नंतर पुढील शिक्षणासाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात,त्यांत संस्था सभासदांच्या पाल्यांचा विशेष गुणगौरव सोहळ्यात खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करणेत आले.
१.)चि.ओम अमरीश बडगुजर:NEET= 97.40%
२.)चि.आदित्य मनीष बडगुजर:Neet=97.33%
३.)चि. मयंक प्रशांत साळुंखे:MHCET:96.00% व JEE=86.00%
४.)चि.मंथन सचिन बडगुजर:MHCET=80.00%


५.)चि सार्थक किरणचंद्र साळुंखे:MHCET=72.80%
६.)कु.वैष्णवी चव्हाण:NEET=70%
७.)चि.सुजल स्वप्नील पाटील:MHCET-89%
[ % = percentile वाचावे. ]

——–•—–•——•—–
👉विशेष प्रविण्य प्राप्त पाल्य
१.)कु.डॉ.सृष्टी पंकज बडगुजर:BAMS परीक्षेत सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय,संगमनेर,महाविद्यालयात प्रथम
२.)चि स्नेहील राजेंद्र बडगुजर,सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे येथून सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण.
नंतर कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालय,चोपडा व कै.ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालय,कुंड्यापाणी-बीडगाव येथील इ.१०वीत प्रथम आलेले व विशेष प्राविण्यासह यश संपादन केलेल्या विद्यार्थी/विद्यार्थींनीचा गुण गौरव करण्यात आला.
मंचावर उपस्थित मान्यवरांचे मनोगत,अध्यक्षीय मार्गदर्शन व श्री.पी.एन. पाटीलसर यांनी आभार प्रदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश भोईटे सरांनी केले.सदर कार्यक्रमाअंती सुरूची स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*