आज १० जुलै:१८ वा जागतिक मातृ सुरक्षा दिवस
आई शब्द ऐकल्या क्षणी काळजाला एक वेगळी अनुभती मिळते,मला जन्म देतांना आईला झालेल्या वेदना ह्या वेदना नसून तिचा दुसरा जन्म असतो,कारण🤰 गर्भावस्थेत🫄असतांना/ बाळाला जन्म देता-देता आईला आपले प्राण ही गमवावे लागतात,अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आजचा दिवस मातृ सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.
आई ही आई असते तिला जगी तोड नसते
आई आहे म्हणून जगात माया-ममता आहे
सन २००५ पासून,दरवर्षी १० जुलै रोजी जगभरात “मातृ सुरक्षा दिन” साजरा केला जातो.
“जागतिक आरोग्य संघटना” (WHO) याची जगभर अंमलबजावणी सुरू केली.मातांचे आरोग्य हे हा दिवस साजरा कऱण्यामागचा हेतू आहे. मातांचे आरोग्य आणि मातृत्वा दरम्यान मांतांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करण्याचा हा दिवस.आईचे आरोग्य आणि विशेषतः गरोदर पणाच्या कालावधीत होणा-या मृत्युदरात झालेली वाढ,याबाबत जनजागृकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
गरोदर पणात अनेक महिला ब्लड प्रेशर,हृदयाशी संबंधित आजार,खुप रक्तस्त्राव यामुळे प्राण गमावतात.अशा वेळी योग्य माहिती असणे आणि त्या महिलेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच दोन मुलांमध्ये किती वर्षाचे अंतर ठेवावे, गरोदरपणात कशी काळजी घ्यावी.या गोष्टी माहित असणे ही तेवढेच महत्वाचे आहे.
सुरक्षित मातृत्व साजरे करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा आजचा मातृ सुरक्षा दिवस सुद्धा खास आहे.
१० जुलै मातृ सुरक्षा दिन म्हणून निवडण्याचे कारण:
महत्त्वाचे खास कारण म्हणजे ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. लोकसंख्येची वाढ आणि नवमातांचे आरोग्य याचा संबंध जोडून १० जुलै हा दिवस निवडण्यात आलेला आहे.आजच्या दिवशी जिच्यामुळे आपण या सुंदर जगात प्रवेश केला त्या आपल्या आईचे आभार मानण्यासाठी हे खास संदेश तिला नक्की पाठवा.
कोठेही न मागता,
भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई.!
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही..!!
म्हणून त्याने तूला निर्माण केलंय आई…!!!
〰️〰️🫄🤰🫄🤰🫄🤰🫄🤰🫄🤰🫄〰️〰️



Leave a Reply