ठाणे शहर पो.आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी श्री दिपक जाधव साहेब यांचे आयकॉन फाउंडेशन सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष माननीय श्री मोहन हिरालाल बडगुजर यांच्या कडून सत्कार – श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, सुरत

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी दीपक जाधव यांना माननीय राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित
पोलीस सह आयुक्त ठाणे शहर यांचे वाचक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक जाधव मानपाडा पोलीस ठाणे यांच्या अति उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी सेवेबद्दल यंदाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी 2023 माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी राष्ट्रपती पोलीस पदक या सर्वोच्च सन्मानाने गौरविलेले आहे.विशेषतः संपूर्ण भारत देशातून एकूण 54 व महाराष्ट्र राज्यातून चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधिकारी श्री दीपक जाधव यांना हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री दीपक जाधव यांनी अवैद्य अम्मली पदार्थ, ड्रग अवैद्य हत्यारे दारुगोळा हस्तगत करणे कोरोना महामारी संघटित गुन्हेगारी स्थानबद्धता तडीपार यामध्ये तसेच समाजातील दुर्बल घटक गरजू व्यक्ती तसेच पीडित महिला, मुली, अपंग व्यक्ती, जेष्ठ नागरिक,
सर्वसामान्य नागरिकांबद्दल अत्यंत सकारात्मक भावना दृष्टिकोन ठेवून विशेष कामगिरी केली आहे.
अशा या आमच्या दीपक जाधव साहेबांना माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी राष्ट्रपती पोलीस पदक या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर आपले आजचे लीड सिंगर व भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाचे सरचिटणीस व भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तसेच आयकॉन फाउंडेशन सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष माननीय श्री मोहन हिरालाल बडगुजर यांच्या वतीने व या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रदीप नायर व स्कायहाइट्स चे श्री विजय बडगुजर हे साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करून सन्मान करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*