22 June: नवी मुंबई येथील चिन्मया विजय बडगुजर हिने सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक दिले. त्यात योगचे महत्व , आसनांचे सादरीकरण, आसनांचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. शाळेचे प्राचार्य पालवे सर यांनी चिन्मयाचे कौतुक केले .योग काळाची गरज आहे हे तीने आपल्या भाष्यद्वारे पटवून दिले. शारीरिक व मानसिक विकास करण्यासाठी योग्य तर आवश्यक आहेच पण जीवन जगण्याची शैली पण योग कशा प्रकारे बदलवू शकते याचा दृष्टिकोन समजावला. वसुधैव कुटुंबकमची भावना मनात बाळगत योग चा संदेश मुलांपर्यंत पोहोचवला.
चिन्मया हि सध्या एम. एस. सी. चे शिक्षण घेत असून ती एक उत्तम योग शिक्षिका देखील आहे. या आधी तिने योगसाधनेचे वर्ग देखील घेतले आहेत.
तिने योग विद्या निकेतन, वाशी येथून योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (योगिक शिक्षणाचा डिप्लोमा) पूर्ण केला आहे. आणि त्याच बरोबर तिच्या बॅचलर डिग्री देखील करत होती.
तिने योगोपचार, निसर्गोपचार आणि नैसर्गिक राहणीमान (योग आणि निसर्गोपचारतज्ज्ञ) मध्ये डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे.
याबद्दल चिन्मयाचे मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा.





Leave a Reply