आज २३ जून🔱बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा २६२ वा स्मृतिदिन🔱🚩
〰️〰️〰️🚩🔱🚩〰️〰️〰️
बाळाजी बाजीराव हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते.ते थोरल्या बाजीराव यांच्यानंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले.त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले,त्यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे* येथे झाला,लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती.थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली.बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले.
शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले.१७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहूंचा वारस रामराजा हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतींच्या गादीवर होते तरीही बाळाजी यांनी छत्रपतींच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला.त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीराव यांनी छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात राघोजी भोसले यांनी पूर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले.१७४३ मध्ये राघोजींनी ओरिसा प्रांतात मराठी सैन्य घुसवून अलिवर्दी खानावर जबरदस्त हल्ला चढवला आणि ओरिसा, तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओरिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले. १७४९ साली छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम (द्वितीय) यांचा सातार्यात राज्याभिषेक करण्यात आला.पुढच्याच वर्षी नानासाहेब पेशवे दक्षिणेत निजाम राजवटीवर मोठी फौज घेऊन चालून गेले.या संधीचा फायदा उठवत ताराराणींनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर करा अशी छत्रपतींना गळ घातली. पण छत्रपतींनी या गोष्टीस नकार दिला.बिदरवर चढाईच्या मनसुब्यात असलेल्या नानासाहेब पेशव्यांना दामाजी आणि ताराराणीच्या बंडाची खबर मिळताच सर्व खाशी फौज घेऊन त्यांनी सातार्यास कूच केली.सातार्याच्या किल्ल्याला वेढा घातला आणि छत्रपती राजाराम (द्वितीय) यांना कैदेतून मुक्त करा असा खलिता ताराराणीना पाठवला.
नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती. परंतु १७६१ च्या तिसर्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला,त्याच पराभवाच्या धक्क्याने…
२३जून१७६१ रोजी बाळाजी बाजीरावांचे निधन झाले: इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना काळा चबुतरा (क्रांतीचौक) येथे तोफेच्या तोंडी देऊन शहीद करण्यात आले.काहींना फाशी देण्यात आली होती. या…
युद्धातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त २३ जून रोजी शासकीय पातळीवर स्मृतीदिवस पाळण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
तात्याराव टोपे,नानासाहेब पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादेतही १८५७ च्या उठावाची ठिणगी पडली होती.याची चाहूल लागताच इंग्रजांनी आपल्या सैन्यातील हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवून दिले.
२३ जून १८५७ रोजी उठाव करणाऱ्या २१ क्रांतिकारकांना शहीद करण्यात आले: तोफेच्या तोंडाला बांधून, काहींना काळा चबुतरा येथे फाशी देण्यात आली होती. या युद्धात हिंदू-मुस्लिम यांची एकता वाखाणण्याजोगी होती.इंग्रजांनीच १८५७ च्या उठावाची घटना लिहून ठेवली आहे.त्यांच्या आधारेच विविध संदर्भ दिल्याचे डॉ. रमजान यांनी नमूद केले. औरंगाबादच्या छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या सहकार्याने पुरावे गोळा केले. शासनाकडे २३ जून हा दिवस शासकीय पातळीवरही स्मृतीदवस म्हणून पाळला जावा,अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या २६२ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन…🙏🌹


Leave a Reply