जळगांव येथील श्री. निलेश तात्याबा बडगुजर, धरणगांव येथे ASI पदी पदोन्नती झाल्याबद्दल बडगुजर विद्याप्रसारक मंडळातर्फे त्यांचा सहपरिवार सत्कार

शेंदुर्णी ह. मु. जळगाव येथील श्री.निलेश तात्याबा बडगुजर हे धरणगाव येथे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांची दि.९-६-२०२३ रोजी ASI पदी पदोन्नती. श्री. निलेश बडगुजर हे दि. १९-३-१९९३ रोजी छ. संभाजी नगर येथे पोलीस दलात रुजू झाले. श्री. निलेश बडगुजर यांची कन्या कु. अक्षता निलेश बडगुजर यांचे शिक्षण हे बी. टेक झाले असून त्या पुणे येथे विप्रो कंपनीत कार्यरत आहेत. मुलगा चि. रोहन निलेश बडगुजर पण बी. टेक झाले असून रिलायन्स कंपनीत कार्यरत आहेत..

श्री. निलेश तात्याबा बडगुजर हे धरणगांव येथे पोलीस ASI पदी पदोन्नती झाल्याबद्दल बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव चे अध्यक्ष श्री. विकास पुंडलिक बडगुजर, उपाध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले, खजिनदार श्री. राजेंद्र दत्तात्रय पवार व सामाजिक कार्यकर्ते श्री. लोकेश कोतवाल यांनी त्यांचा सह पत्नी हार गुच्छ देऊन सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*