आज १५ जून-जागतिक पवन🌎दिन. [ GLOBAL WIND DAY ]
जून महिना सुरु झाला आहे.या दरम्यान,प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे.या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.जून महिन्यात सामाजिक,आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात १५ जूनचे दिनविशेष.
पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात २००७ पासून झाली.२००९ साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.
➖➖➖➖➖〰️〰️〰️〰️〰️➖➖➖➖➖
आज जून:मिथुन संक्रांती[Mithun Sankranti]
हिंदू पंचांगानुसार, वृषभ राशीतील प्रवास पूर्ण करून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो.या राशी बदलाला मिथुन संक्रांत म्हणतात.अशा एका वर्षात बारा संक्रांती असतात. सूर्य हे शिस्तीचे प्रतीक आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली जाते.
➖➖➖➖➖〰️〰️〰️〰️〰️➖➖➖➖➖



Leave a Reply