
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांचे शिष्टमंडळाने नुकतीच जळगांव नगरीस सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस जळगांव येथील बडगुजर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विकास पुंडलिक बडगुजर व उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश महाले यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील व आरोग्य मंत्री मा. श्री. गिरीष भाऊ महाजन यांचेशी संपर्क साधून निवेदन देण्यास अनमोल सहकार्य केले. यावेळी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणेचे विद्यमान उपाध्यक्ष श्री. राजेंद्र बडगुजर, कार्याध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक मा. श्री. प्रदीप त्र्यंबक बडगुजर व कार्यकारिणी सदस्य श्री. लोकेश कोतवाल हे प्रतिनिधी उपस्थित होते.


बडगुजर समाजाला पुणे विभागात जागा मिळण्यासाठी बडगुजर बहुउद्देशीय संस्थेचे शिष्ट मंडळ आज या राजकीय नेत्यांची विशेष भेट घेतली. यावेळी दोन्ही मंत्री महोदयांनी यावर विचार करून सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या दोन्ही राजकीय नेत्यांच्या भेटीसाठी अनमोल सहकार्य करणाऱ्या श्री. विकास बडगुजर व श्री. सुरेश महाले यांचा विशेष सत्कार बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे प्रतिनिधी यांचे मार्फत करण्यात आला व मंडळाच्या वतीने आभार पण व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply