आज १२ जून-खगोल तथा गणिती शास्त्रज्ञ- ज्यांनी-जगाला पहिल्यांदा शून्याची ओळख करून दिली ते ‘आर्यभट्ट’ आज स्मृतिदिन: जगाला सर्वात आधी शून्याची ओळख करून देणारे भारतीय,तसेच ग्रह नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इ.स.१५०० च्या पूर्वीचे महान व्यक्तिमत्व, आपण सर्व या महान व्यक्तिमत्वाला ओळखत असणारच ते म्हणजे खगोलशास्त्री आणि गणितज्ञ आर्यभट्ट आज त्यांच्या स्मृतिदिन.
आर्यभट्ट यांचे सुरुवातीचे जीवन: आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याविषयी कुठेही असा ठोस पुरावा नाही परंतु आर्यभट्ट यांनी त्यांच्या “आर्यभटिया” या ग्रंथात असा उल्लेख केला आहे कि जेव्हा कलियुगाचे ३६०० वर्ष संपले होते तेव्हा त्यांचे वय २३ वर्ष होते, तर यावरून त्यांचा जन्म इसवी सन ४७६ ला झाला असेल असे इतिहासकार मानतात.आर्यभट्ट यांचे निधन इसवी सन ५५० च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते.
आर्यभट्ट यांचे कार्य: आपण आज सहज समजतो आणि मानतो सुद्धा कि पृथ्वी अंडाकृती आहे आणि तिच्या स्वतःच्या ध्रुवावर फिरते. तेच नाही तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होतात, हे सुद्धा आपण आता मानतो.
➕ आपण समजतो कि हि गोष्ट सर्वात आधी जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकस नी सांगितली पण निकोलस कॉपरनिकस यांच्या १ हजार वर्ष अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात फक्त हेच नव्हते सांगितले कि पृथ्वी गोल आहे, तर तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते तर आपण विचार करू शकता कि आर्यभट्ट यांनी त्या काळात कसे या गोष्टीचे संशोधन केले होते.
➕ आर्यभट्ट यांनी आर्किमिडीज़ पेक्षाही अचूक अशी “पाय” ची किमंत सांगितली होती, ती अशी होती ३.१४१६. परंतु नालंदा विश्वविद्यालयाला जाळण्यात आले होते तेव्हा तेथील काही महत्वाची ग्रंथे जाळल्या गेली होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील बरेचश्या गोष्टी आज नष्ट झालेल्या आहेत, आणि त्यामुळे त्यांनी केलेले काही नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहचले नाहीत.
➕ १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंती निमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
➕ भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने २००९ मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये शोधलेल्या तीन जिवाणूंपैकी एका जीवाणुला “बॅसिलस आर्यभट’ असे नाव दिले.
➕आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला ‘आर्यभट्ट’ असे नाव दिले आहे.
आर्यभट (पहिले) हे त्यांच्या ‘आर्यभटीय’ या गणिती ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनीच लिहिलेल्या माहितीवरून त्यांचा जन्म इ. स. ४७६ मध्ये झाला असणार असा तर्क करता येतो.’आर्यभटीय’वरून असाही अंदाज करता येतो की, कुसुमपूर ऊर्फ पाटलीपुत्र (सध्याचे पाटणा!) येथे त्यांचा जन्म झाला असावा आणि तिथेच त्यांनी अध्ययन आणि संशोधन करून मौलिक ज्ञान मिळवले असावे. आर्यभट नालंदा विद्यापीठाचे कुलपती असावेत असा काहींचा तर्क आहे.अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी लिहिलेला ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ जगभरातील अनेक विद्वानांनी अभ्यासला आहे, वाखाणला आहे; तसेच त्याची अनेक भाषांतरेही झालेली आहेत.
मध्ययुगीन भारतातील बहुतेक गणितींप्रमाणे आर्यभटही खगोलज्ञ होते.म्हणूनच नवल नाही की, ‘आर्यभटीय’ ग्रंथाच्या चार विभागांपैकी ‘गणितपाद’ हा विभाग पूर्णत: गणिताला वाहिलेला असून, बाकीचे तीन विभाग (दशगीतिका, कालक्रियापाद व गोलपाद) खगोलशास्त्राला वाहिलेले आहेत. या ग्रंथात एकूण १२१ पद्ये असून, त्यातील गणितपादामध्ये ३३ पद्ये आहेत.गणितपादामध्ये संख्यांचे वर्गमूळ व घनमूळ काढायच्या पद्धती, द्विमितीय आकारांच्या क्षेत्रफळांची सूत्रे, त्रिमितीय वस्तूंच्या घनफळांची सूत्रे, श्रेढी गणित, कुट्टक सोडवण्याची पद्धत, त्रराशिक, एकपदीय समीकरणे, ‘पाय’ची आसन्न किंमत (३.१४१६), मूलभूत त्रिकोणमिती आणि विविध कोनांच्या ‘ज्या’ फलाच्या किमती (कोणत्याही कोनाच्या ‘साईन’ गुणोत्तराला ३४३८ ने गुणल्यावर त्या कोनाची ‘ज्या’ किंमत मिळते.) अशा अनेक मूलभूत बाबी आहेत. विविध संख्यांसाठी विविध वर्ण योजून त्या-त्या वर्णापासून तयार होणारे (मात्र, एरवी निर्थक ठरणारे) शब्द त्यांनी संख्यालेखनासाठी वापरले. (उदा. ‘ख्युघृ’ असा शब्द ४३२०००० या संख्येसाठी). यामुळे मोठमोठय़ा संख्यांसाठी अल्पाक्षरी शब्द तयार करणे त्यांना शक्य झाले. मात्र, यातूनच ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ काही प्रमाणात क्लिष्ट झाला.
कालगणना, ग्रहांच्या कक्षा, ग्रहांचे क्रांतिवृत्ताबरोबर होणारे कोन, ग्रहांचे व्यास, ग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर, ग्रहांच्या गती, ग्रहांची प्रकाशमानता, ग्रहणविचार अशा अनेक खगोलीय घटनांचा मागोवा ‘आर्यभटीय’मध्ये घेतलेला आहे. यावरून असा तर्क निघतो की, ग्रहांची गोलाकारता तसेच सूर्य-चंद्रांच्या ग्रहणांमागील कार्यकारणभाव त्यांना माहीत होता. त्यांनी वापरलेली मापनाची एकके आज निश्चितपणे ज्ञात नसली तरीही त्यांनी पृथ्वी व चंद्र यांचे व्यास जवळपास अचूक शोधले होते असे अनेक अभ्यासान्ती पुढे आले आहे. पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती परिवलन करते असे आर्यभटांनीच सर्वप्रथम मांडले होते.आर्यभटांचा मृत्यू इ. स.५५० मध्ये झाला असा अंदाज आहे. इसवी सनानंतर भारतीय गणिताचा सुवर्णकाळ आर्यभटांपासून सुरू झाला असे मानले जाते.
1️⃣➕2️⃣➖3️⃣➗4️⃣✖
जीव+➕नाचे ℅✖️πगणित➗
जीवन हे एक गणित आहे.टप्प्याटप्प्याने ते सोडवले तर ते सोपे आहे,आणि घाईगडबडीत सोडवले तर ते अवघड आहे.
.जीवन म्हणजे गणितातील एक समीकरण आहे,त्याला सुखाने गुणावे,दु:खाने भागावे,🤝मित्र मिळवावेत, 👥शत्रू वजा करावेत,बाकी उरते फक्त आपल्या जिवनाचे समाधान.दुसरे म्हणजे सौंदर्य आणि चैतन्य यांची बेरीज करावी.यशातून अपयशाची वजाबाकी करावी.प्रेमाला शुद्ध अंत करणाने गुणावे,वेळेला कामाने भागावे.🗣परनिंदेची वर्गमूळ काढावे 🙏सुविचारांच्या वर्ग करावा.🤝मैत्रीतून मत्सर वजा करावा.🙏🙏सत्य परमार्थाचे समीकरण सोडवावे,म्हणजे आपल्या जीवनाचे गणित आपोआपच सुटते😍असे मला वाटते.जीवनरूपी विशालकोन मृत्यूने छेदला आहे,आणि त्या छेदाला समांतर प्रीतीची रेषा आहे.जीवनाच्या गणितात आनंदाचा गुणाकार आहे.समाधानाची वजाबाकी आहे व दु:खाचा अनाकालीन भागाकार आहे.आनंदाच्या गुणाकाराला दु:खाने भागून येणाऱ्या उत्तराचा ल.सा.वी. काढून पाहिला तर तो आशामय आहे व म.सा.वी.काढला तर निराशमय आहे,म्हणजेच, जीवन हे आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचे सुंदर कमलपुष्प उमलावे,त्या कमलपुष्पाच्या पाकळीवर पडलेल्या सुंदर असा दवबिंदू💧म्हणजे,आपले जीवन होय!
जीवन म्हणजे केवळ एक वणवा आहे,कुणीतरी पेटवलेला,कसा तरी पेटणारा,कुणाला तरी जाळून काढणारा आणि केव्हातरी असाच वीझणारा.
मानवी जीवन मूलतः द्वंद्वपूर्ण आहे.जिथे भावनेचे- वासनेशी,विवेकाचे-विचाराशी आणि क्षणभंगूराचे- चिंतनाशी,सतत युद्ध चाललेले असते.जीवन म्हणजे जन्म मरणाच्या मार्गावरून संथपणे वाहणारी सरिता,जी परमात्मस्वरूपी सागराशी मिळण्यासाठी आसुसलेली व मुक्तीसाठी तळमळलेली असते.जीवन म्हणजे कुणीतरी कुणासाठी काहीतरी करायचं असतं यातच,जीवनाचं सर्वस्व असतं.हसणाऱ्यांनी
मर्यादेचे बंधन पाळायचे असते तर बोलणाऱ्यांनी आपल्या शब्दांच्या खेळीवर लक्ष द्यायचे असतयं!.
ll🔱🙏शुभम् भवतु:🙏🔱ll 🔱🌹जागतिक गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🔱
1️⃣➕2️⃣➖3️⃣✖️4️⃣➗



Leave a Reply