आज ९ जून – वसंत देसाई यांचा जन्मदिन
घनश्याम सुंदरा या भूपाळीनें फक्त देवच प्रसन्न होतो,असे नाही तर जे लोक सकाळपासून रेडिओ लावतात आणि भक्तिसंगीत ऐकतात त्यांच्या दिवसाची सुरवात देखील प्रसन्न होते हा अनुभव सगळ्यांना येत असतो.
सावंतवाडी जवळील सोनवडे गावी जन्मलेल्या वसंत देसाई याना देवळात होणाऱ्या भजन, कीर्तनामधील चालींमुळे लहानपणापासून संगीताची आवड निर्माण झाली.म्हणून ते कोल्हापूरला आले तेथे प्रभात फिल्म कंपनी मध्ये त्यांनी गोविंदराव टेंबे यांचे सहाय्यक म्हणून काम केले.नंतर कंपनी पुण्याला गेली त्यांच्या बरोबर ते देखील पुण्याला गेले.
१९४३ साली त्यांनी राजकमल साठी प्रथमच स्वतंत्रपणे संगीत दिले आणि नंतर ३० वर्षे त्यांनी एकाहून एक सुंदर गाणी केली मराठी हिंदी मिळून त्यांनी ६५ चित्रपटांना संगीत दिले.
विशेष: अमर भूपाळी या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायली होती. हाच चित्रपट १९५२ साली बंगाली भाषेमध्ये तयार केला आणि त्यातली गाणी मान्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायली. संगीतकार होते अर्थातच द ग्रेट वसंत देसाई.
त्यांनी संगीत दिलेल्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला होता.
सिनेमांबरोबर त्यांनी नाटकांना संगीत दिले होते. गीता गाती ज्ञानेश्वर,जय जय गौरीशंकर,देव दीनाघरी धावला,पंडितराज जगन्नाथ,प्रीतिसंगम,शाबास बिरबल.
त्यांनी संगीत दिलेली मराठी ,हिंदी मधील गाणी म्हणजे मैलाचा दगड ठरली आहेत.अगदी थोड्या गाण्यांचा उल्लेख करतो.
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भरजरी ग पीतांबर
रम्य ही स्वर्गाहून लंका
ऋणानुबंधांच्या जिथून
संत ज्ञानेश्वर चित्रपटात शांताराम आठवल्यांचे गाणे आहे. चारी भावंडे रानोमाळ फिरताना गाडीवान शेतकऱ्याला दिसतात.तो त्यांची चौकशी करतो आणि साऱ्यांना बैलगाडीत बसवतो आणि गाणे म्हणतो आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे हे गाणे चित्रपटात वसंत देसाई यांच्यावरच चित्रित झाले आहे.चाल त्यांनी बांधली असल्यामुळे ग्रामीण बाजाचे गाणे त्यांनी ठसक्यात म्हटले आहे.
होमी वाडियांचा स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटात रावणाच्या तोंडी रम्य ही स्वर्गाहून लंका हे गाणे दिले आहे. बलाढ्य रावण हे गाणे म्हणतो आहे असा प्रसंग. रावणाचे हे गर्वगीत गदिमांनी लिहिले.हे गाणे गाणाऱ्याचा आवाजही भारदस्त हवा म्हणून वसंत देसाईंनी भीमसेन जोशी यांच्या आवाजात रेकॉर्ड करूया असे ठरवले. गदिमा,वसंत देसाई आणि भीमसेनजी यांच्यामुळे एका सुंदर गाण्याचा जन्म झाला.
त्यांनी संगीत दिलेली काही हिंदी गाणी
हमको मनकी शक्ती देना
तेरे सूर और मेरे गीत
ए मलिक तेरे बंदे हम
जीवन मे पिया तेरा साथ रहे
भारत सरकारने त्यांना १९७१ साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.
इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



Leave a Reply