१ जून-लालपरी दिन – बडगुजर. इन

आज १ जून-लालपरी दिन
महाराष्ट्राची सर्व सामान्यांची लालपरी ७५ वर्षांची झाली

राज्य परिवहनाची लालपरीl
आम जनतेच्याtc पसंतीस खरीll
सर्वसामान्यांची लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस आज ७५ वर्षांची झालीय.
महाराष्ट्राच्या रस्त्यावर १ जून १९४८ला पहिल्यांदा एसटी बस धावली.आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती,त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता.तेव्हा गुजरात,मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते,त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते.
ही पहिली बेडफोर्ड कंपनीची एसटी बस नगर आणि पुणे धावली होती-विशेष म्हणजे या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे दोघे होते.
पहिल्या एसटी बसची बॉडी लाकडी होती.बसचे वरचे छप्पर चक्क कापडी होते. या बसची आसनक्षमता ३० होती.नंतर हळूहळू शेवरले,फोर्ट,बेडफोर्ड,सेडान, स्टडेबेकर,मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन,लेलँड,कोमर आणि फियाट या कंपन्यांच्या बसगाड्या येऊ लागलेला होत्या.

👇लालपरीचा प्रवास👇
👉 महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आल्यानंतर त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू करण्यात आले.

👉 “गाव तेथे एसटी” “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यनुसार हळूहळू खेड्यापासून शहरापर्यंत एसटीचा विस्तार होत गेला. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते.

👉 या सेवेचा गुजरात, मध्यप्रदेश,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगाणा व गोवा इत्यादी राज्यांत विस्तार झाला आहे.तसेच ३६ बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आज ७४ वर्षानंतर २०००० पेक्षा जास्त बसेस आहेत.
👉 सध्या शासनातर्फे प्रवाश्यांना मोठ्या सवलती म्हणजे,वय वर्षे ७५ आणि पुढील प्रवाशांना मोफत व सर्व महिलांना निम्मे भाडे या सवलती बहाल करण्यात आलेल्या आहेत.
👉एस टीचे सव्वालाखपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.सध्या महामंडळाकडे👉साधी बस,परिवर्तन,एशियाड, हिरकणी,अश्वमेध,शिवनेरी तसेच आधुनिक विठाई, रातराणी,निम-आराम,सिटिंग-कम-स्लीपरकोच,शिवशाही बसेस आहेत.
एस टी महामंडळ, महामंडळाचे सर्व कर्मचारी तसेच प्रवासी बंधूभगिनींना लालपरी दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा_
आपण सर्वांना मिळो सुखी प्रवास l
एस्.टी महामंडळसही उत्पन्न मिळो हमखास ll
ll👉शुभम्🙏भवतु:👈ll
•〰️〰️〰️〰️〰️〰️〰️•🫶•〰️〰️〰️〰️〰️〰️〰️•

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*