आज १२ मे आंतरराष्ट्रीय परिचारिका💉🌡️दिन परिचारिकांच्या आरोग्य क्षेत्रातल्या समाजासाठीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे रोजी जगभरात हा दिन साजरा केला जातो,याच दिवशी परिचर्या शास्त्राला आधुनिक दिशा देणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिनही असतो.
भारतीय सशस्त्र सेनेची लष्करी रुग्णसेवा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करते. परिचर-नेत्तृत्व रुग्णसेवेची बांधिलकी आणि जागतिक आरोग्य हक्काची सुरक्षा या यंदाच्या परिचर दिनाच्या विषयाच्या अनुषंगाने लष्करी रुग्णेसेवेचे सर्व परिचारिका अधिकारी त्यांच्या सेवा गरजूपर्यंत पोहोचवतील, असं प्रतिपादन आकाशवाणीला दिलेल्या शुभेच्छा संदेशात लष्करी रुग्ण सेवेच्या प्रमुख स्मिता देवरानी यांनी केलं.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल(१२मे १८२०-१३ऑगस्ट१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या.इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प” (The Lady with the Lamp) असे म्हणत.अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी दिली.त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्यादिन” म्हणून साजरा केला जातो.
🩺💊💉🩸💉💊🩺
Leave a Reply