⚓११ मे दिन विशेष⚓
११ मे महत्त्वाच्या👇घटना:
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
१८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)
१८५७: पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम:स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८७८: महाराष्ट्रातील पुणे शहराच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. यालाच अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून संबोधले जाते.
१८८८: ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
१९२०: स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापीठाचा निर्णय.
१९२७: चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
१९५१: गझनीच्या महंमदने उध्दवस्त केलेया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंग प्रतिष्ठापना डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली.
१९८७: गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९६: माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९८: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
जन्मदिवस-जयंती-वाढदिवस:
↕️
१८९५: जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)
१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)
१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)
१९१८: क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)
१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.
१९५०: सुप्रसिद्ध भारतीय हिन्दी-मराठी चित्रपट अभेनिते सदाशिव दत्ताराय अमरापूरकर यांचा जन्मदिन.
१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.
१९७२: जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-पुण्यतिथी-स्मृतिदिन:
↕️
१८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन.(जन्म:७मार्च१७९२)
१८८९: जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
१८८५: लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय.
१९९३: शाहू मोडक,अभिनेते.
२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन.(जन्म:२७ मे१९१३)
२००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म:१०ऑक्टोबर१९१५)
➿➿➿➿➿➿➿➿


Leave a Reply