नवी मुंबई येथील श्री. पंडितराव बडगुजर – अमराठी बंधू भगिनींसाठी शिकविणार मराठी भाषा

कामोठे, नवी मुंबई येथील श्री. पंडितराव बडगुजर (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी अमराठी बंधू भगिनींसाठी मराठी भाषा शिकविण्याचा विडा उचलला आहे. नवी मुंबई येथे अनेक अमराठी बांधव राहत असून मुख्यत्वे मल्याळी समाज, कामोठे व इतर दक्षिण भारतीय समाज बंधू भगिनीं हे नोकरी व व्यवसायासाठी येथे वास्तव्यास आहेत. त्यांना रोजच्या वापरासाठी मराठी भाषा शिकल्यास खूप मदत होईल व सामाजिक सलोखा देखील उत्पन्न होईल – हीच भावना मनात ठेवून जेष्ठ नागरिक संस्था, कामोठे तर्फे हे वर्ग आयोजित केलेले आहेत. हे वर्ग सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे आज १२ मार्च, रविवार पासून सुरु झालेले आहेत. श्री पंडितराव बडगुजर हे जेष्ठ नागरिक संस्था, कामोठे येथील कार्यकारणीं सदस्य असून या उपक्रमासाठी ते विनामूल्य शिकवणार आहेत.

श्री. पंडितराव बडगुजर यांचे मुळगाव बोराडी हे असून गेल्या अनेक वर्षापासुन ते शिरपूर येथे वास्तव्यास होते. शिवमाई ह्या झालेल्या मराठी पुस्तकाचे ते लेखक देखील आहेत.

त्यांच्या या अभिनव उपक्रमास नवी मुंबई बडगुजर समाजातर्फे हार्दिक अभिनंदन

1 Comment

  1. अभिनंदन मित्रा , . मराठी भाषेला प्रसाराचे अमूल्य काम आपण करीत आहात . वाचून खूप आनंद झाला ! पुनश्च आपले अभिनंदन आप्पा !

Leave a Reply to Dharmendra Badgujar sir Cancel reply

Your email address will not be published.


*