अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट, सुरत अंतर्गत बडगुजर समाज युवा संघठन, सुरत आयोजित स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम हा दिनांक २६/०२/२०२३ रोजी कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराजवळ पार पडला. प्रथम कुलस्वामिनी चामुंडा माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन हे करण्यात आले .नंतर कार्यक्रमाची सुरुवात ही करण्यात आली. प्रमुख पाहुणे, अतिथी यांचे गुलाब पुष्प, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. बडगुजर सुरतवासी हे कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डान्स स्पर्धा ही आयोजित केलेली होती यात लहान पासून तर युवकांपर्यंत डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. एक एक स्पर्धकांनी आपला परफॉर्मन्स हा दाखवला व त्यांना फुलपुष्प गुच्छ देऊन व सहभाग घेतला उत्तेजनार्थ त्यांना बक्षीस देऊन त्यांचा ही सत्कार करण्यात आला. बडगुजर समाज महिला भगिनी यांचे हळदी कुंकू व त्यांनाही भेटवस्तू देऊन हळदी कुंकू कार्यक्रम हा संपन्न झाला. व भोजनाचा आस्वाद हा घेण्यात आला या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व सुरत वासीय यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सर्वांच्या अनमोल उपस्थितमुळे कार्यक्रम बहारदार झाला. यात विशेष अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट सुरत यांनी एक आदर्श घडविला त्यांनी बडगुजर युवा संघटन सुरत येथील युवा सदस्य यांना सोबत घेऊन, युवकांना योग्य सहकार्य करत मार्गदर्शन करून,आम्ही तुमच्या बरोबर आहे अशी ग्वाही देत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
🕉️ थेट प्रक्षेपण
बडगुजर. इन व प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमानाने आपल्या साठी ..
खालील दिलेल्या लिंकवर 👇आपण पाहु शकतात
https://www.youtube.com/live/RTeoOWCuxHk?feature=share
लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ









Leave a Reply