समाजबांधव श्री. किशोर देविदास बडगुजर हे सध्या ओमान या देशामध्ये आय सी ए या कंपनीमध्ये रिजनल सेक्शन हेड या पदावर कार्यरत आहेत.
त्यांना MINISTRY OF OMAN तर्फे TAQDEER AWARD या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार वॉटर ट्रान्समिशन प्रोजेक्टमधील २०२२ सालच्या त्यांच्या विशेष योगदानामुळे देण्यात आला.
श्री. किशोर बडगुजर यांचे मुळ गाव बहादरपुर असून अनेक वर्षांपासून ते नवीन पनवेल, नवि मुंबई येथे देखील वास्तव्यास आहेत. हल्ली 15 वर्षां पासुन मस्कत, ओमान येथे ते वास्तव्य करून आहेत.
त्यांच्या पत्नी सौ समीता या गृहिणी असून व मुलगी आदिती हि बिझनेस अनालीस्ट या पदावर IT कंपनीमध्ये हैद्राबाद येथे रुजू आहे. त्यांचा मुलगा आर्यन हा ओमान येथे 10 वि ला शिक्षण घेत आहे. श्री. किशोर हे बहादरपूर येथील सौ. सयाबाई व श्री. देविदास पुंडलिक बडगुजर यांचे चिरंजीव असून मालेगाव येथील सौ. आशालता व भास्कर दोधू पवार यांचे ते जावई आहेत.
बहादरपुर, फागणे, पनवेल व म्हसवद एथील सर्व परीवारातील सदस्यांनी तसेच सर्व नातेवाईकांनी त्यांना पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.


Congratulations kishor sir.
Heartiest congratulations Kishor Saheb 💐
अभिनंदन 🌹🌹