कल्याण, जिल्हा ठाणे येथे राहणारे व मुळगाव अमळथे येथील श्री.मनोहर गंगाराम गिरणार यांची मंगळवार. दिनांक 28 फेब्रुवारीं 2023 रोजी, सेंट्रल रेल्वे, माटुंगा वर्कशॉप मध्ये ३६ वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाले. त्यांचा सन्मान समारोह रेल्वे वर्कशॉप माटुंगा तसेच कल्याण येथे राहत्या स्थळी पार पडला.
श्री मनोहर गंगाराम गिरनार यांचा जन्म दि. 07 फेब्रुवारी १९६३ रोजी झाला, त्यांनी धुळे येथून ITI चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काहि कालावधीतच 1987 मध्ये ते रेल्वे विभागात माटुंगा येथे रुजू झाले…
रुजू झाल्यानंतर आपले कौशल्य व कार्य तात्परता ह्या दोन अंगी असलेल्या गुणांमुळे रेल्वे मधील महत्वाचे खाते म्हणजे ‘व्हील शॉप’ मध्ये त्यांनी खुप कमी कालावधीतच अव्वल स्थान मिळवलें. तेच सातत्य टिकवत नंतर त्यांच्या प्रमाणेच नवीन जॉईन केलेल्या एम्प्लॉई ना ही तेवढ्याच कार्य कुशल पद्धतीने आणी कौशल्याने करता यावे म्हणून त्यांनाच ही ट्रेनिंगची देखील जबाबदारीही दिली गेली. त्यांनी आपले काम सांभाळत इतर नवीन रुजू झालेले तरुणांना ही ती कार्यकुशलता शिकवली. या साठी त्यांच्या खात्याने त्यांची विशेष दखल घेत मनापासुन् आभार मानले.
स्वभावाने शांत असलेल्या श्री मनोहर यांना त्यांची पत्नी सौ. शकुंतला यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाची साथ दिली. त्यांच्या कुटुंबात मुलगा श्री. विकास गिरणार व सुन सौ. माधुरी गिरणार हे सहकुटुंबं कल्याण येथेच राहत असून मुलगी सौ. दिपिका जयंत बडगुजर व जावई श्री.जयंत नितीन बडगुजर असून सध्या पुणे येथे राहत आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन, नवीन ठिकाणी स्वकर्तृत्वावर त्यांनी आजपर्यंत मजल मारली असून गावाकडील ही भाऊबंदकी देखील सांभाळत आपले कर्तव्य पाळणारे श्री. मनोहरशेठ गिरणार यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपल्या बडगुजर परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा…
Leave a Reply