” अस्तित्व”……
भावना माझ्या जरी…विचार फक्त तुझाच आहे….
मनाच्या मोरपिसाऱ्यावर बहर प्रेमाचा आहे…
श्वास माझा असला तरी,ध्यास तुझाच आहे…
तृषार्त,कासावीस जीवाला आस फक्त तुझीच आहे…
तू अवखळ वारा,मी रिमझिम पाऊस धारा…
उरी दाटे त्याच त्या आठवणींचा पसारा…
आठवण माझी असली तरी,साठवण मात्र तुझीच आहे..
ह्या ध्यास वेड्या मनात तुझ्याच स्वप्नांची गुंफण आहे…
धुंद तो पाऊस लावी वेड जीवा,
चांदणराती सोबतीला तुझ्या शब्दांचा गोडवा…
गीत माझे असले, तरी संगीत मात्र तुझेच आहे,
गुणगुणणाऱ्या सुरांची रोज नवी पहाट आहे…
शब्द माझे असले तरी,अर्थ तूच आहेस..
अस्तित्व माझे असले तरी स्वामित्व मात्र तुझेच आहे………..
~ सौ. शुभांगी पराग बडगुजर
जामनेर येथील ह. मु. जळगाव सौ. शुभांगी पराग बडगुजर यांचे शिक्षण हे एम. ए. बी. एड. इंग्लिश या विषयातून झाले आहे. त्यांनी अखिल भारतीय गधंर्व महाविद्यालयातील संगीत विशारद (गायन शास्त्रीय) पूर्ण केले आहे, तसेच संगीत भास्कर, संगीत प्रभाकर, हेही पूर्ण केलेले आहे. सौ. शुभांगी बडगुजर हे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल जळगाव येथे टीचर म्हणून कार्यरत आहेत.ते कल्चर इव्हेंट मध्ये जाणे जाणे त्यांना आवडते. त्यांना वाचन, लेखन, कविता, चारोळी याचीही आवड आहे. आकाशवाणी जळगाव येथे युवावानी, माहेर, ह्या दोन प्रसारण विभागात त्यांनी कामही केले आहे. (ऑल इंडिया रेडिओ प्रसारण भारतीय येथे वानी प्रमाणपत्र अभ्यासक्रम अँड ग्रॅज्युएशन अनाउन्समेंट आकाशवाणी जळगाव येथे केले आहे) रेडिओ सिटी ९१.१ एफ. एम. द्वारे “मिसेस आर जे” म्हणून सन्मानित, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम केले आणि कार्यक्रमां मध्ये अँकरिंग आणि सिंगिंग परफॉर्मन्स, एन. एम. यू. जळगाव द्वारे “युवा रंग” मध्ये परीक्षक म्हणून नियुक्ती, “प्रतिभा संगम अखिल” मध्ये निवड व सहभाग, नांदेड येथे भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २२ ते २४सप्टेंबर २००२, जाणता राजा प्रतिष्ठान जळगाव तर्फे “हिरकणी” पुरस्कार, सकाळ तर्फे “मधुरांगण तेजस्विनी”पुरस्कार साठी नामांकित, ऑल इंडिया रेडिओ जळगाव येथे प्रासंगिक उद्दगोषक, कला आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानवाधिकार संघटना नवी दिल्ली द्वारे अलीकडेच “खान्देश रणरागिणी” २०२१ मध्ये सन्मानित करण्यात आले, राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम उत्कर्ष २०२० साठी परीक्षक, के. बी. सी. द्वारे आयोजित केलेल्या “युवा रंग’ २०१८ – २०१९ शास्त्रीय गायन स्पर्धेसाठी परीक्षक (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) कुसुंबा, क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव मार्फत आयोजित युवा महोत्सव २०२२ मध्ये दि. ३ व ४ जानेवारी मध्ये कोविड १९ व्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने लोकगीत गायन स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळाली, नवोदय बडगुजर समाज जागृती व उन्नती महा सेवासंघ फागणे आयोजित “बडगुजर समाज महिला गुणगौरव सोहळा” गर्व आम्हा बडगुजरचा २०१७ कार्यक्रमात सौ. शुभांगी पराग बडगुजर यांना संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अश्या सौ. शुभांगी पराग बडगुजर यांना मानाचा मुजरा व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
सौ. शुभांगी पराग बडगुजर – ९४२३४८७११०, ८६६८९५३७६४
shubhangibadgujar1980@gmail.com
सौ. शुभांगी पराग बडगुजर यांचे Moods n Music ह्या *युट्युब चॅनेल वर विविध गाणी, कविता, इतर सर्व माहिती बघावे, व सर्वांनी नक्की पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा, *व्हिडिओस लाईक व सबस्क्राईब करावे*👇🏻
Moods n Music
… He YouTube channel















Leave a Reply