कु.प्राजक्ता स्वानंद बडगुजर कुर्हे पानाचे हिचे शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विशेष कामगिरी – श्री. निलेश बडगुजर, भुसावळ

कुर्हे पानाचे येथील कु. प्राजक्ता स्वानंद बडगुजर हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विशेष कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कु. प्रांजल ही कुऱ्हे पानाचे येथील आदर्श शिक्षक पुरस्कृत कै. सुरेश रणछोड बडगुजर यांची नात तर कै. स्वानंद सुरेश बडगुजर यांची सुकन्या आहे. कु. प्राजक्ता ही खेळासोबतच अभ्यासातही हुश्शार विद्यार्थ्यीनी आहे.

नुकत्याच जळगांव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल कडून खेळतांना तिने विशेष कामगिरी करत आपल्या संघाला यश मिळवून दिले.

कु. प्राजक्ता चे बडगुजर.इन कडून हार्दिक अभिनंदन व पुढील भव्यदिव्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यापुढेही तिने असेच दैदिप्यमान यश संपादन करावे व समाजाचा नावलौकिक करावा या सदिच्छा 🌹🌹

2 Comments

  1. हार्दिक अभिनंदन प्राजक्ता

Leave a Reply

Your email address will not be published.


*