चंद्रकांत शांताराम बडगुजर यांची नेट परीक्षेत इंग्रजी विषयातून घवघवीत यश संपादन – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

फागणे, ह. मु. सुंदरगढी चोपडा येथील श्री. शांताराम एकनाथ बडगुजर व सौ. संगिता शांताराम बडगुजर यांचे सुपुत्र
चंद्रकांत शांताराम बडगुजर यांची नेट परीक्षेत इंग्रजी विषयातून घवघवीत यश संपादन केले, नेट परीक्षा १३ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली होती आणि आणि निकाल ५ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती, व यूजीसी नेट परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला. या नेट परीक्षेत चोपडा तेथील चंद्रकांत शांताराम बडगुजर यांनी इंग्रजी विषयातून घवघवीत यश संपादन केले. कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथुन इंग्रजी विषयातून एम.ए आणि चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथून बी.एड पूर्ण केल्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते या नेट परीक्षेची तयारी करत होते. त्यांनी आपल्या परिस्थिती वर मात करत यश संपादन केले, त्यांची स्वतःची शेती नसल्याने यांचे आई आणि वडील दुसऱ्याच्या शेतात हात मजुरी करतात. योग्य पुस्तकांचा अभाव, अतिशय हलाखीची परिस्थिती, अत्यल्प शैक्षणिक साहित्य यातून योग्य वेळी योग्य मार्ग काढत त्यांनी हे यश संपादन केले. मोठ मोठी पुस्तके विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत होती यासाठी त्यांनी वेळप्रसंगी अनेक छोटे छोटे जे काम मिळेल ते करत राहिले व रेशन दुकानावर देखिल काम केले, दिवसभर काम करून रात्री जो वेळ मिळत होता तो पूर्ण वेळ ते अभ्यासासाठी वापरत असत. नेट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मोठ-मोठी कोचिंग क्लासेस जॉईन करतात; कुणी हैदराबादला जातात तर कोणी दिल्लीला जातात मात्र बडगुजर सरांनी घरीच राहून रात्री उशिरापर्यंत जागरण करून संपूर्ण अभ्यास पूर्ण केला. अश्या खडतर प्रवासातून एवढे मोठे यश संपादन केले म्हणून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

चंद्रकांत शांताराम बडगुजर – ८९७५८९०१६३

3 Comments

  1. हार्दिक अभिनंदन चंद्रकांत सर

Leave a Reply

Your email address will not be published.


*