जळगांवच्या चि. श्रेयस प्रदीप चव्हाण चे इ. १० वी च्या परिक्षेत यश, सेंट लॉरेन्स स्कूल मधून व्दितीय

जळगांव, येथील समाज बांधव श्री. प्रदीप चव्हाण व Adv. सौ. वैशाली प्रदीप बडगुजर (Jalgaon District court ) यांचा मुलगा चि. श्रेयस प्रदीप चव्हाण याने सेंट लॉरस स्कूल, जळगांव येथे दहावी च्या (SSC) शालेय परीक्षेत ८६ % गुण मिळवून शाळेतुन दूसरा येण्याचा मान पटकावला आहे.

श्री. प्रदीप चव्हाण हे छाया कॉम्पुटर क्लासेस, CSC महा इ-सेवा व आधार केंद्र , कासमवाडी चौक, जळगांवचे संचालक आहेत. चि. श्रेयसच्या यशा मागे आई वडिलांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व आशीर्वादामुळे हे यश मला मिळाले असे श्रेयस यावेळी म्हणाला.

चि. श्रेयसला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सेंट लॉरेंस स्कूल, जळगांव चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या कडून कौतुक करण्यात येत आहे.
बडगुजर.इन टिमकडून चि. श्रेयस चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.

1 Comment

  1. रामकृष्ण पांडुरंग बडगुजर, दोंडाईचा (धुळे)
    June 26, 2022 at 4:05 pm

    खुपच छान…👌👌👌
    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
    शुभेच्छा श्रेयस ! 💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*