धुळे येथील समाजातील नामवंत व्यक्तिमत्त्व स्व. नारायण राजाराम बडगुजर (निवृत्त जेलर) यांचे नातू , श्री. मोहनराव नारायण बडगुजर (निवृत्त पोलीस अधिकारी, मुंबई) यांचे चिरंजीव तथा अमळनेर येथील श्री. सुरेश देवलाल मांडळकर यांचे जावई – श्री. यशपाल मोहनशेठ बडगुजर यांनी नुकतीच त्यांची पी. एस. आय. (पोलिस उपनरीक्षक) पदाची ट्रेनिंग पुर्ण केली. त्यांचा बॅच क्रमांक १२१ असून दीक्षांत समारंभ शुक्रवार, १७ जुन २०२२ रोजी पार पडला. येत्या काही दिवसातच त्यांना मुंबई शहरात PSI पदावरील सेवेची संधी मिळणार आहे.
श्री. यशपाल बडगुजर हे २००१ साली पोलीस दलात शिपाई पदावर रूजू झाले. तद्नंतर त्यांनी पोलीस दलात गेली २१ वर्षे विविध भुमिका यशस्वीरीत्या बजावल्या व पोलीस शिपाई वरून पोलीस नाईक (वाहतूक शाखा) पदोन्नती मिळवली.
सदर कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून अपर पोलीस पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके ,महाराष्ट्र राज्य, मुंबई हे उपस्थित होते हा कार्यक्रम में परेड ग्राउंड, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे झाला.
कदाचित बडगुजर समाजातील पोलिस दलात विविध पदावरील ३ पिढ्या सेवा देणारे एकमेव कुटुंब असून तिसऱ्या पिढीत तो वारसा यशस्वीपणे श्री. यशपाल हे चालवीत आहेत.
आपण अश्या व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे इतरांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी आहेत, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. चाह है तो राह है. अतिशय उमदा व धाडसी व प्रचंड इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठता याची जाण बाळगत श्री. यशपाल शेठ यांनी नुकतेच आपले पी. एस्. आय पद आपल्या मेहनतीने मिळविले – लवकर च ते या पदावर विराजमान होणार आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल बडगुजर. इन टिम तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
💐💐💐 मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐
व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !