गांधली पिळोदे ह. मु. जळगांव येथील श्री. विवेक (छोटू) घनश्याम बडगुजर हे भारतीय दुरदर्शन केंद्र, जळगांव येथून सेवानिवृत्त

अमळनेर गांधली पिळोदे ह.मु.जळगांव येथील : श्री.विवेक (छोटू) घनश्याम बडगुजर हे भारतीय दूरदर्शन केंद्र या विभागात दिनांक ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेत. दुरदर्शन केंद्रात अतिशय यशस्वीपणे कार्य करीत त्यांनी विविध भुमिका सांभाळत ३५ वर्षे निरतंर सेवा देऊन आता ते सेवानिवृत्त झालेत.

श्री. विवेक यांनी दि. १७/१२/१९८६ मध्ये मालेगांव येथे सेवेत रुजू झाले होते. तेथे ७ वर्षे सेवा झाली. त्या नंतर त्यांचा विवाह २८ जाने १९८८ मध्ये कै. चुनिलाल रामदास बडगुजर दोंडाईचा यांची कन्या सौ. प्रतिभाताई यांचेशी झाला होता. त्यांना एक मुलगा कुणाल व एक कन्या रत्न जागृती असे दोन आपत्य झाले. व १७/१२/१९९३ मध्ये आवाढांग (गुजरात) दूरदर्शन केंद्र या विभागात सिनिअर इंजिनियर म्हणून पदोन्नती (प्रोमोशन) वर बदली झाली तेथे ४ वर्षे सेवा केली नंतर धुळे येथे ६ वर्षे, जळगांव येथे ८ वर्षे,असाच पुन्हा बदलीचा प्रवास ४ वर्षे खंडवा येथे बदली झाली.

असे खडतर बदलीच्या परिश्रमात त्यांच्या सहचारिणी सौ. प्रतिभाताई यांचा सिंहाचा वाटा असून अशा अडचणीवर मात करुन मुलांना शिक्षणा साठी प्रेरणा देवून मुलगा कुणाल हा Mechanical (M.E.) व मुलगी जागृती Mechanical(B.E.) मुलांना उच्च शिक्षण पूर्ण करीत तसेच अमरावती येथील श्री.सुरेश एकनाथ पडोळे यांची (कन्या) सौ. प्रियंका कुणाल बडगुजर ह्या सुनबाई देखील Computer(B.E.) असून सध्या पुणे येथे नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत तसेच चोपडा येथील राजेंद्र वसंतराव बडगुजर यांचे चि. श्री अंकुश राजेंद्र बडगुजर (जावाई) हे देखील Mechanical(B.E.) असून सध्या पुणे येथे नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत.

असे परिश्रम व परिक्रमा करत पुन्हा जळगांव येथे वास्तव्यास असून मुलांचे शिक्षण, लग्न वगैरे वगैरे जबाबदाऱ्या पार पाडल्या व शेवटच्या ६ वर्षे पूर्ण करत अशी एकंदरीत ३५ वर्षाच्या खडतर प्रवासातून निष्कलंक सेवा दिनांक ३१ मे २०२२ मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाले.

आपले पुढील आयुष्यातील सारी स्वप्न साकार व्हावी,आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, निरोगी, निरामय, आनंददायी जावो, आणि या पुढील काळात आपल्या हातुन सामाजिक कार्य घडत राहो! पुनश्च आपणांस पुढील भावी आयुष्य निरोगी, निरामय, आनंददायी जाण्यासाठी बडगुजर. इन, वेब पोर्टल टीम कडून माता चामुंडा चरणी प्रार्थना!

श्री. विवेक (छोटू) घनश्याम बडगुजर, तुलसाई नगर, कालिका माता मंदिर जवळ,
जळगांव. मो. 9423492074

2 Comments

  1. Congratulations to Vivekshet Badgujar Best Wishes for Happy Retiremen💐💐🎉

Leave a Reply

Your email address will not be published.


*