हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!
भोकर, ह.मु. उल्हासनगर नं. ०१ येथील आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम सिताराम भिलमाळ(बडगुजर) यांची नुकतीच उल्हासनगर येथील महाराष्ट्र मित्र मंडळ, शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री. शांताराम भिलमाळ सर यांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळा मध्ये सुरुवातीला बस वाहक ( कंडक्टर) म्हणून नोकरीस सुरुवात केली. ते अतिशय कुशल व प्रभावशाली कार्य करत असत त्यामुळे त्यांच्यातील कला गुणांमुळे व सिनिअरटीमुळे डेपो व्यवस्थापक (कंट्रोल) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ते प्रदीर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झाले आहेत.
त्याच बरोबर आपल्यातील शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक कला गुणांमुळे महाराष्ट्र मित्र मंडळ शिक्षण संस्था उल्हासनगर नं.०१ या शैक्षणिक संस्थेत विश्वस्त असून सलग तीस वर्षा पासून संस्थेच्या अनेक पदांवर काम करीत असतांना संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र मित्र मंडळ शिक्षण संस्थेच्या दिनांक १७/०४/२०२२ च्या सभेत त्यांची महाराष्ट्र मित्र मंडळ संचालित बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, वाचनालय, व्यायाम शाळा, महाराष्ट्र मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेच्या तीन हजार विद्यार्थी संख्या असलेल्या संस्थेची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपणाकडे आली ही समाज बांधवांच्या दृष्टीने खूप मोठी गौरवाची बाब आहे. उल्हासनगर येथील महाराष्ट्र मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेच्या सभेत आपली बिनविरोध
अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याबद्दल बडगुजर.इन, प्राउड गृप,बडगुजर वेबपोर्टल टीम कडून पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच आपल्या हातून यशस्वी कार्य होत रहोत अशी माता चामुंडा, व परमेश्वर चरणी प्रार्थना!
Congratulations