नंदुरबार: सौ. आशालता व अशोक शिवदासशेठ बडगुजर यांची नात, तसेच रेल्वे विभागातील कर्मचारी श्री संदीप अशोक शहा व आरती संदीप शहा यांची कन्या, मनस्वी अर्थात श्रुती (BE. Computers) हिचा कल्याण येथील सौ शोभाबाई व राजेंद्र दयारामशेठ बडगुजर यांचे चिरंजीव निलेश (Sr. Software Engineer, Accenture) यांच्याशी दिनांक सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी भगवती लॉन्स नंदुरबार येथे थाटामाटात शुभ विवाह पार पडला.
लग्नसमारंभाला समाजातील अनेक व्यक्तींचा सहभाग लाभला व त्यांनी वधू वरास शुभाशीर्वाद दिले. विवाह प्रसंगी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.
मनस्वी हि श्री. अलका व अशोक रामदासशेठ बडगुजर यांची नात आहे. आत्या – सौ. अलका हेमराज बडगुजर (भुसावळ) व सौ. योगिता गणेश बडगुजर (जळगाव) यांनी कार्यक्रमास रंगत आणून मामा – श्री. महेश अशोक बडगुजर (औरंगाबाद) व राहुल (बँगलोर) यांनी विशेष मेहनत घेऊन कार्य सिद्धीस नेले.
कार्यक्रमाला मनस्वी व निलेशयांचे काका, आत्या, मामी, मावशी तसेच समाजातील अनेक वरिष्ठ व्यक्तींचे शुभ आशीर्वाद लाभले.
या नवदांम्पत्यांचा रेशिमबंधगाठी आगमनाच्या मंगलमय समयी नववधू-वरांची जोडी प्रेमळ,सुखद प्रेमाचे हे बंधन सुख-समाधानी,आनंदी जावो, तथा आनंदाने भरलेले राहो, तसेच पुढील संसार रुपी जीवन रथयात्रेचा प्रवासाला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन तथा ईश्वर चरणी प्रार्थना !
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर डॉट इन टीम, वेब पोर्टल टीम कडून नवविवाहित दांपत्यस हार्दिक शुभेच्छा.
Leave a Reply