नवी मुंबई येथील बडगुजर समाज नेहमीच विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. याआधी समाजाने संस्कृतीक सहल तसेच अनेक इतर छोटेखानी समारंभ आयोजित केलेले आहेत. दिनांक 11 डिसेंबर, शनिवार रोजी नवी मुंबई, पनवेल परिसरातील बडगुजर समाजाने छोटेसे गेट-टुगेदर करीत भरीत पार्टी चे आयोजन केले होते. यासाठी खास खानदेशातून भरीताची वांगे मागवण्यात आली होती. सर्व पदार्थ बनवण्यासाठी समाज बांधव व भगिनींनी एकत्रित येत भरीत- भाकरी, खिचडी-कढी, ठेचा या खास खान्देशी स्वरूपातील व्यंजनांना बनवून त्यांचा अस्वाद घेतला.
हा कार्यक्रम समाजसेवक व बडगुजर उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. भगवान लक्ष्मण शेठ बडगुजर यांच्या पनवेल येथील फार्महाऊस वर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये बाल गोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी खान्देशी संगीताच्या साथीने सहभाग नोंदवून कार्यक्रम साजरा केला.
Leave a Reply