कु. नुतन नवनीत बडगुजर ही एम. एस. सी. मायक्रोबाओलॉजी उत्तीर्ण – श्री. विवेक बडगुजर, चंद्रपूर

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

!!अभिनंदन!! अभिनंदन!!अभिनंदन!!

अमळनेर येथील राहणार कै. नवनीत नामदेव बडगुजर यांची मुलगी कु. नुतन नवनीत बडगुजर ही कवियत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगांव मधुन एम. एस. सी. मायक्रोबाओलॉजित उत्तीर्ण झाली. कु. नुतन ही अतिशय हुशार विद्यार्थ्यांनी होय. तिला विज्ञान क्षेत्रात करिअर करायची अपार इच्छा होती. तिची ही जिद्द पाहून वडिल कै. नवनीत बडगुजर हे तिला नेहमीच सपोर्ट व मार्गदर्शन करत असत. कै. नवनीत हे मुक्ताईनगर येथील राजूरा येथे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. नुकताच जगभर त्रासलेल्या कोविड १९ चा सर्वे करत असतांना त्यांना कोविड ची लागण झाली व काळाने घाला घातला. कु. नुतन व तिचा परिवार पार खचून गेले होते. वडिलांची इच्छा होती की नुतन प्रोफेसर बनावे. आणि ती इच्छा पुर्ण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेत हे घवघवीत यश संपादन केले. कु. नुतन हिने १२ वी सायन्स व पदवीचे शिक्षण महाराणा प्रताप महाविद्यालय अमळनेर येथून पुर्ण केले. व त्याच महाविद्यालयातून तिने प्रोफेसर म्हणून नोकरीची संधी मिळवित आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

कु. नुतनच्या या यशाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून कु. नुतनचे व संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹

3 Comments

  1. सुकुमारी नुतनदीदीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    /
    डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*