महाराष्ट्र पोलीस दलातून ३३ वर्ष सेवेतून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||


श्री. ईश्वर भिला पाटील (चव्हाण)
मुळ गाव  : भोकर (तापी)
ह.मु. : बदलापूर (मुंबई)

श्री.ईश्वर भिला पाटील, महाराष्ट्र पोलीस दलातून ३३ वर्ष सेवेतून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन दि.३०/११/२०२१ ला सेवानिवृत्त झाले.
त्यांचे बालपण तसे गरीबीतच गेले ते लहान असतानाच वडिलांचे छायाछत्र हरपले (वडील स्वर्गवासी) झाले परंतु कुटुंबाची सर्व जबाबदारी ही आई जयवंताबाई व वडील बंधू स्व. तुकाराम भिला चव्हाण यांचे वर आली.
कुटूंबाची जबाबदारी ही वडीलकी म्हणून मोठे बंधू कै. तुकाराम चव्हाण(बाळु भाऊ) यांनी स्विकारली, ते हयात असे पर्यंत.

भाऊ हे पोस्ट सेवेत कल्याण येथे नोकरीत होते.  त्यावेळच्या तुटपुंजी वेतनावर त्यांनी कुटूंब प्रमुखाची जबाबदारी उत्तम पार पाडली.
भोकर येथेच दहावी पर्यंतच शिक्षण घेतलं व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी कल्याण चा रस्ता धरला. व काॅलेज शिक्षण अर्धवट असतानाच आईच्या आग्रहाखातर लग्न ही झालं, मग कुटुंब जबाबदारी काय असते ही समज लवकरच आली. पण नोकरी नव्हती. काही ही करून नोकरी मिळवली पाहिजे हा ध्यास लागला.

एस.आर.पी. ची भरती असल्याच कळलं व भरती ठिकाणी पोहचलो. जबाबदारीचं भान असल्यामुळे मी जीवाच्या आकांताने मैदानावर धावत सुटलो आणि माझी निवड झाली.
एस.आर.पी प्रशिक्षण खूपच कठीण व जीवघेणं असतं. ते का कठीण असतं , हे नक्षलवाद ग्रस्त क्षेत्रातील माझ्या नेमणूकी वरून कळलं.
माझ्या कठीण समयी  माझी पत्नी सौ. आशा हिची सोबत(साथ) मला प्रेरणादायक राहीली.

काही वर्ष एस.आर.पी. मध्ये खडतर सेवा केल्यानंतर माझ्या विनंती अर्जावर मला ठाणे ग्रामीण पोलीस दलात घेण्यात आलं. सेवा ही नेहमीच निर्व्याज्य असावी ह्या वर्तणूकी वर पोलीस दलातही  काम केलं व आज सहा.उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालो.

जिवन प्रवास वाटेवर अनेकजणांच सहकार्य लाभले. काही ऋण फेडता येत नाहीत, पण कायम कृतज्ञता भाव मनात ठेवून मी माझे सर्व आप्तस्वकीय , मित्र व पोलीस दलातील सहकारी यांना कृतज्ञपूर्वक प्रणाम करतो. 🙏🙏


सेवानिवृत्ती नंतरच्या वाटचालीत आपणास अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

यासाठी : 👇
संवाद ठेवूयात- संपर्कात राहूयात

2 Comments

  1. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखी समाधानी व आनंदी राहो यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  2. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे समाधानाचे,भरभराटीचे व आरोग्यदायी जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply to श्री निंबा बाबुराव बडगुजर, फागणे (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*