||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
बडगुजर समाजात मानाचा तुरा; तरुणासाठी प्रेरणादायी असे श्री नरेश बडगुजर यांचे यश
जळगाव (प्रतिनिधी) येथील दादावाडीतील, श्रीराम नगरातील श्री. नरेश चंद्रकांत बडगुजर (ह.मु. नाशिक) यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचे ‘स्वीय सहाय्यक’, (राजपत्रित अधिकारी) पदी नुकतीच पदोन्नती मिळालेली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पाेलिस निरीक्षक, श्री चंद्रकांत माधवराव बडगुजर यांचे ज्येष्ठ सुपूत्र श्री नरेश बडगुजर हे सन-२००५ मध्ये औरंगाबाद येथील धर्मादाय सह आयुक्त या विभागीय कार्यालयात ‘लघुलेखक’ (उच्च श्रेणी) म्हणून नाेकरीस रुजू झाले हाेते. त्यानंतर दोन वर्ष उत्तम सेवा बजावल्यानंतर त्यांची नाशिक व पुणे येथे धर्मादाय कार्यालयाअंतर्गत बदली करण्यात आली.
आपल्या कामाला सतत याेग्य न्याय दिला तर त्याला प्रगतीचा शिखर सहज सर करता येते या उक्तीप्रमाणे त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची दखल वरिष्ठांनी घेऊन श्री नरेश चं. बडगुजर यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त, मुंबई येथील कार्यालयात ‘स्वीय सहाय्यक’ राजपत्रित अधिकारी पदी पदाेन्नती झाली. सदर बाब बडगुजर समाजासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या यशाने समाजात मानाचा तुरा राेवला गेला आहे. तसेच त्यांनी मिळविलेले यश हे भावी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे. या यशात त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांचा खारीचा वाटा आहे. उच्चशिक्षित श्री नरेश बडगुजर यांच्या जीवनकार्याविषयी बाेलायचे म्हटले तर अंत्यत शांत, संयमी व नेहमी प्रत्येकांच्या सहकार्यासाठी धावून जाणे हा त्यांचा स्वभावाच आहे. कार्यालयात देखील काेणतेही साेपे, अवघड काम ते सहजपणे पूर्ण करतात. त्यांचे बालपण हे अत्यंत संघर्षातून गेले आहे. वडील श्री चंद्रकांत माधवराव बडगुजर हे पाेलिस खात्यात नाेकरीला असल्याने त्यांची सातत्याने बदली हाेत असल्याने श्री नरेश यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले. वडीलांना नाेकरीला न्याय देता यावा म्हणून आई साै. लताबाई चंद्रकांत बडगुजर यांनी पुढाकार घेऊन दाेन मुले व एक मुलगी यांना चांगल्या संस्कारासह त्यांच्या शिक्षणाचा पाया उत्तम पद्धतीने रचला आहे. एवढेच नव्हे तर कुटुंबाचा राहाटगाडा देखील चांगल्या पद्धतीने हाकला आहे. आई-वडीलांनी केलेला त्याग व संघर्षाची जाणीव ठेवून मुलांनी देखील प्रगतीचे शिखर गाठले आहे. माेठ्या भावाप्रमाणे लहान भाऊ श्री पंकज चंद्रकांत बडगुजर यांचे कार्य व यश हे देखील काैतुकास्पद असेच आहे. एमएस्सी बीएड शिक्षण घेऊन पंकज हे रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर जावई श्री राजेंद्र प्रकाश जाधव हे भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये चांगल्या पदावर नाेकरीला असून बहिण सौ.स्वाती राजेंद्र जाधव हिचे बीएड झाले असून ती घरी क्लासेस घेते. आजाेबा श्री माधवराव गणपत बडगुजर (बहादरपूर, ता. पाराेळा) हे जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. श्री चंद्रकांत बडगुजर यांच्या दाेन्ही सुना सौ चारुशिला नरेश बडगुजर व सौ किर्ती पंकज बडगुजर या सुध्दा उच्चशिक्षित आहेत. श्री नरेश बडगुजर यांच्या कार्याबद्दल व त्यांना मिळालेल्या पदाेन्नाेतीबद्दलअखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 व बडगुजर समाजातर्फे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव हाेते आहे. 🌹🌹
Congratulatios sir
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
💐💐💐