||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
धुळे – जो.रा.सिटी हायस्कूलच्या सभागृहात नुकतीच जिल्हा क्रीडा महासंघाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.त्यात वीर अभिमन्यू पुरस्कार विजेते व महाराष्ट्र राज्य खो-खो संघाचे माजी कप्तान पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांची सचिवपदी निवड झाली.
सभेचे अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष डॉ.महेश घुगरी होते.आश्रयदाते धुळे शहरातील मा.आ.राजवर्धन कदमबांडे,जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव,तसेच योगीराज मराठे हे मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी यांनी केले प्रास्ताविक प्रसंगी बोलतांना ते म्हणाले की पुढील काळात राष्ट्रीय क्रीडा सप्ताह,युवा सप्ताह,मँरेथाँन स्पर्धा,विविध खेळांचे प्रशिक्षण सराव शिबिरे व जिल्हास्तरीय स्पर्धा,महिला दिन व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार,यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतील जिल्ह्यातील 71 क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अकरा हजार एक रु.महासंघाला मा.आ.राजवर्धन कदमबांडे यांनी वर्गनी म्हणून जाहीर केले.डॉ.महेश घुगरी यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीस पदी पंढरीनाथ बडगुजर यांची बिनविरोध निवड झाली.म़ा आ.कदमबांडे म्हणाले की,सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी यांनी महासंघासाठी एकजुटीने काम करुन संपुर्ण राज्यात महासंघाचे नाव झाले पाहिजे.असे काम करा.क्रीडाधिकारी यांनाही त्यांनी सांगितले की आपणही शहरातील मैदानात विविध स्पर्धांचे आयोजनासाठी सहकार्य करा.व महासंघासाठी पाहिजे त्या उपक्रमांसाठी प्रयत्न करा. कोषाध्यक्ष प्रा.बारसे सरांनी आजपर्यंत झालेला खर्च व पुढील काळातील अर्थसंकल्प महासभेत सदर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला.सुत्रसंचालन प्रा.संदीप बाविस्कर तर आभार प्रा.बारसे सरांनी केले.
अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन आपले हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
श्री पंढरीनाथ बडगुजर,सचिवपदी नियुक्ती झाल्या निमित्त खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐👌👍
खुप खुप अभिनंदन शेठ
मनःपूर्वक अभिनंदन 💐💐👏👏
Abhinandan,