चांगले करिअर निवडण्यासाठी केव्हाही हातात पैसे असतील तर त्याचा उपयोग हा निश्चितच होतो. हे बरोबर आहे. पण हातात पैसे नसतील तरी उत्तम करिअर उभं करता येतं हे आपल्या प्रयत्नांमधून चि. आदित्य यांने दाखवून दिले आहे. मात्र त्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. जे जे आपल्याकडे नाही. ती प्रत्येक कमी कष्टाने भरून काढावी लागते.
आजच्या काळामध्ये परिश्रम न करता यश मिळवण्याचे धाडस विद्यार्थी करत असतात. परमेश्वर मायाळू, दयाळू आहे. पण प्रगती करण्यासाठी त्याने श्रमाला महत्त्व दिले आहे. मानवाने प्रयत्न करून सगळ्या गोष्टी मिळवाव्या असे त्या विधात्याला वाटते.म्हणूनच परमेश्वराने सार्या वस्तू श्रमाने प्राप्त व्हाव्यात म्हणून दडवून ठेवलेल्या आहेत. हिऱ्याची खान त्याने नाही ठेवली. अखंड खाणीमध्ये एखादा हिरा लपून ठेवला. प्रत्येक फुलात मधाचा काही अंशच ठेवला. मानवाने मेहनत करावी हा त्यामागचा उद्देश आहे. अहो देवांना प्रयत्न चुकले नाही. कारण अमृत निघेपर्यंत त्यांना समुद्रमंथन करावे लागले. मग आपण तर माणूसच. नाही का ?
हाच कष्टाचा महान मंत्र जपत 1992 मध्ये अमळनेर येथून आपल्या संसाराचा जम बसवण्यासाठी श्री राजेंद्र रामदास बडगुजर व त्यांची धर्मपत्नी सौ अलका यांनी सुरत गाठले. हाताला मिळेल ते काम करत राजेंद्र बडगुजर यांनी संच मशीन चालविणे शिकून घेतले. सोबतीला अलकाताईनी मशिन काम करून चरितार्थ सुरू केला.
अशा हलाखीच्या परिस्थितीत चि. आदित्यचा जन्म झाला."" श्रेष्ठता बुद्धिमत्ता जन्मजातच असावी लागते "'' या गोष्टींना ठेच देत. त्याने सुरत मध्येच दहावी मध्ये 61% गुण मिळविले. त्यानंतर बारावी कॉमर्समध्ये सहज प्रयत्नसाध्य असलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर 81 टक्के गुण मिळविले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही पहिले आलेच पाहिजे असे मात्र मुळीच नसते.
आईवडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना आपल्या अभ्यासातील, जीवनातील प्रत्येक कमी त्याने आपल्या अथक कष्टांनी भरून काढली. कारण त्याने ठरवले होते माझ्याकडे ट्यूशन लावायला पैसे नाहीत..... मग मी जास्त वेळ अभ्यास करीन. माझ्याकडे एका विषयाची वेगवेगळी गाईड्स पुस्तक घ्यायला पैसे नाहीत..... मग मी तो विषय इतका पक्का समजून घेईन की मला गाईडची गरजच पडणार नाही. माझ्याकडे अभ्यास करण्याची वेगळी खोली, टेबल-खुर्ची, स्टडी रूम, नाही.....मग मी माझ्याकडे असलेल्या जागेत इतका एकाग्रपणे अभ्यास करायला शिकेल कि बाहेर लावलेल्या लाऊड स्पीकर चा आवाज मला ऐकू सुद्धा येणार नाही.
“””कोई साथ दे ना दे ,चल ना तू सीखले..
हर आगसे होजा वाकिफ, जलना तू सीखले …..
कोई रोक नही पायेगा, बढने से तुझे मंजिल की तरफ
हर मुष्कील का सामना करना तू बस सीखले……..

काहीश्या याच परिस्थितीतून पुढे जात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण भारतातून लाखो विद्यार्थी बसणाऱ्या आणि केवळ 26 टक्के निकाल लागलेल्या सीएच्या फाउंडेशन परीक्षेतील पहिली पायरी 13 सप्टेंबर 2021 रोजी आदित्यने गाठली.
आदित्य म्हणतो की ,""माझ्याकडे काय नाही हे मला पक्कं माहीत होतं. कारण ते मी जगतच होतो. रात्र अन् दिवस....... पण माझ्याकडे काय आहे, हेही मला पक्कं माहीत होतं. माझ्याकडे बुद्धी होती. चिकाटी होती. कष्ट करण्याची तयारी होती. माझे आईवडील माझ्या पाठीशी होते आणि माझ्याकडे स्वप्न होती."".
म्हणूनच आपल्या आर्थिक परिस्थितीचा, गरिबीचा कधीच बाहू न करता. टी वाय बीकॉम करत असतानाच, चि.आदित्यने सीए फाउंडेशन च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल सीएच्या फाउंडेशन परीक्षेत तो प्रथम श्रेणीत पास झाला. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले आणि तुमच्याकडे गुणवत्ता आहे हे जर तुम्ही इतरांना दाखवून दिले तर सर्व जण तुम्हाला मदत करत असतात. याचा प्रत्यय आदित्यला आपल्या जीवनात आला.
“”सफलता के लिए तो संघर्षही करना पडता है साहब ,
किस्मत तो अकस्मात और सट्टे मे काम आती है….
आपल्या भावाचा हाच वारसा पुढे चालवत आदित्यची बहिण कु. पल्लवी इयत्ता दहावी मध्ये बहिणाबाई शाळा जळगाव येथे 74 टक्के गुण मिळवून प्रथम आली होती. नुकतीच बारावी कॉमर्स मध्ये तिने 88 टक्के गुण मिळवले आहेत. भविष्यात तिलासुद्धा सीए करावयाचे आहे. तर लहान बहीण कु.कल्याणी ही नुकतीच 90 टक्के गुण मिळवून दहावी परीक्षा पास झाली आहे. अशा लक्ष्मीची कमी, वानवा असलेल्या परंतु सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबामध्ये आदित्यने मिळवलेल्या या यशामुळे सर्वांनाच तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे.
त्याच्या या यशा निमित्त त्याचे व त्याच्यावर संस्कार करणाऱ्या आई-वडिलांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप तसेच गौरीनंदन कन्स्ट्रक्शन्स,.. पवार विमा सर्विसेस.. यांचे संचालक श्री संतोष आणि श्री राजेन्द्र त्र्यंबक पवार... तसेच चिरंजीव आदित्य याचे मामा समाधान सिताराम बडगुजर यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी काळाच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. शुभम भवतु..................
शेवटी एवढेच म्हणेन की, आदित्यने हे दाखवून दिले की, यश मिळवण्यासाठी मोठं घर लागत नाही.....ए सी लागत नाही.... मोठा क्लास लागत नाही..... फक्त जिद्द लागते. कष्ट लागतात, आणि स्वतःवर विश्वास लागतो. कारण यशाचा मार्ग फार अवघड असतो........... फार लांबलचक असतो....... पण त्यावरून चालत जावंच लागतं....... कारण यशाला शॉर्टकट कधीच नसतो.
“There is no shortcut to success and no substitute to hard work.”
शब्दांकन – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव – 9421184495

चि. आदित्य राजेंद्र बडगुजर – मो. नं. 8511064443

Very good Aditya, congratulations🎉🎉
आदित्य, आपणास मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन !
आणि भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Congratulations 💐💐💐
चिं.आदित्य राजेंद्र बडगुजर ( सुरत )
यांचे सुयशा बंध्दल ,
* हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
*’यशस्वी भव : !
Congratulations Aditya and all the best for your future
Congratulations to Aaditya & Patent,Go Ahead in Future💐💐👌👍