चिकन गुनियाचि माहिती
टोगाविरिडे अल्फा वायरस (Togaviridae alphavirus) वंशाच्या RNA विषाणू असलेला चिकनगुनिया विषाणू संक्रमित- एडीज इजिप्ती (Aedes aegypti) किंवा एडीज अल्बोपिक्टस(Aedes albopictus) मच्छराच्या दंशाने पसरतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे 2 ते 12 दिवसात कधीही दिसू शकतात.
चिकनगुनियाची लक्षणे-
चिकनगुनियाचं सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात कारण त्याच्या सोबत तीव्र सांध्यांच्या वेदना असतात. त्यासोबतच पोटात दुखणे, डोळ्यांची व तळहात पायाची जळजळ, चेहऱ्यावर लालसर rash, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही सामान्य चिकन गुनिया ची लक्षणे आहेत.
गंभीर प्रकरणांमध्ये न्यूरोलॉजिकल(Can be found in CSF), रेटिनल( Retinal) आणि हृदयरोगविषयक (Cardiac problems) गुंतागुंत देखील होऊ शकते.
चिकन गुनिया झालेल्या वृद्ध लोकांसाठी तरुणांच्या तुलनेत बरे होणे कठीण होते. Immunity कमी असणाऱ्या लोकांना जास्त त्रास होऊ शकतो, अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे लोक बर्याच वर्षांपासून सांध्यांच्या वेदनानि त्रस्त आहेत. अशा रुग्णांना आयुर्वेदिक औषधींनी पूर्ण अराम भेटतो..
(चिकन गुनिया सोबत किंवा नंतर डोळे येणे, पायावर खूप सूज येणे हे लक्षण देखिल पाहण्यात आहे..)
चिकन गुनियाची सांधे दुःखी ही 1 -2 आठवडे ते 5-6 महिन्यापर्यंत त्रास देऊ शकते..
चिकनगुनिया निदान-
निदानाची पुष्टी करण्यासाठी, लॅब चाचणी आवश्यक आहे. एनजाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट (enzyme-linked immunosorbent) परिक्षण तपासणी ही चिकनगुनिया विषाणूच्या संसर्गाची तपासणी आहे.
ही test महागडी असल्यामुळे लक्षणांवरून देखील डॉक्टर निदान करतात..
संधिवात व चिकन गुनिया फरक-
चिकन गुनिया मध्ये ताप येऊन सांधेदुखी सुरू होते त्यात सांध्यांमध्ये सूज नसते किंवा कमी प्रमाणात असते, ऋतु, वातावरणतील गारवा, आद्रता, AC या गोष्टींचा परिणाम चिकन गुनिया च्या सांधेदुखी वर होत नाही, यांतील वेदना दिवसभर एक सारख्या असतात, याउलट
सांधेवात किंवा Arthritis मध्ये सांध्यावर सूज असते, मोठे सांधे मुख्यत्वेकरून दुखतात, थंड वातावरणात, पावसाळ्यात ह्या वेदना वाढतात, किंवा वातूळ, आंबट पदार्थ खाल्याने देखील यांत वेदना वाढतात, यांतील वेदना सकाळी झोपेतून उठल्यावर व रात्री जास्त असतात..
आयुर्वेदिक उपचार-
आयुर्वेद प्रमाणे याला अस्थिगत ज्वर किंवा वातज ज्वर म्हणू शकतो..
याला आपण तापाच्या उपचारासोबत अस्थी व संधी यांना पोषण देणारी औषधी, तेल किंवा काढे देऊ शकतो, आयुर्वेदोक्त औषधी जसे अस्थि पोषक वटी, शल्लकी गुग्गुळ, गिलोय, शतावरी, मिरे, मूस्ता, कुक्कुन्डत्वाक, अजमोदा, अशी अनेक औषधी देऊ शकतो..(रुग्णाची प्रकृती प्रमाणे)
तसेच घरगुती उपाय म्हणून सुंठ+मेथी+हळद एकत्र करून सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो, सकाळी लवंगाचे पाणी उकळून पिऊ शकतो, किंवा लवंग+तुळस+सुंठ+खडीसाखर यांचा काढा बनवून रात्री घेऊ शकतो..
ताडासन, शवासन सारखे सोपी आसने करू शकतो..
शक्यतो उदड, राजमा, तूरडाळ, थंड पदार्थ, टाळावे.
Proteins, हिंग, सुंठ, लसूण, sunbath, कोमट पाणी भरपूर घ्यावे..
यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ञांच्या सल्याने आयुर्वेदिक औषधी घ्यावी..
चिकन गुनियाची कितीही जुनाट किंवा नवीन सांधेदुखी आयुर्वेदिक औषधांनी पुर्णतः बरी होतांना आम्ही बघितली आहे.
चिकनगुनिया नियंत्रित करण्यासाठी सावधगिरी-
Immunity (रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे)-
Immunity वाढवण्यासाठी चे उपाय सध्या कोरोनामुळे सर्व जगाला माहीत आहे – कारण चिकन गुनिया हा एक viral आजारच आहे, ज्याचा त्रास नाजूक किंवा कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांनाच होतो..
स्वच्छता- आपल्या घराच्या सभोवताली आणि आसपास पाणी साचणार नाही याची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे आहे कारण त्यांच्यात मच्छरांसाठी प्रजनन-स्थळे बनण्याची क्षमता असते.
सर्व पाणी साठवणारे भांडे, टाक्या झाकून ठेवा.
सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा.
आपले एसी ट्रे आणि फ्रिज ट्रे नियमितपणे साफ ठेवा..
डॉ. कमलेश बड्गुजर
९०९६७४४८६६.
समृद्धि हॉस्पिटल
पेठ नाका,पंचवटी, नाशिक.
Very Good Information👌💐💐