पिंप्री खु. ता. धरणगांव येथील समाजबांधव व आदर्श शिक्षक तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल प्रल्हाद बडगुजर सर यांची जळगाव जिल्हा भाजप शिक्षक आघाडी जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.आमदार श्री.राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा नामदार रंजना ताई पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. पाटील, गुरुवर्य श्री.जितेंद्र चौधरी सर हे उपस्थित होते. कै. प्रल्हाद मंगा बडगुजर व गं. भा. सिंधुताई प्रल्हाद बडगुजर यांचे मोठे सुपुत्र आहेत. हे पिंप्री येथे बाळासाहेब मधुकर चौधरी कन्या माध्यमिक हायस्कुल पिंप्री खु.येथे सन १९९७ पासुन माध्यमिक शिक्षक विभागात आहेत. नोकरी करून ते आपले वडिलोपार्जित दुध डेअरी चा ही व्यवसाय ते अहो दिवस रात्र सांभाळत आहेत त्यांत त्यांचे द्वितीय बंधु श्री. विनोद बडगुजर त्यांना मदत करतात लहान बंधु श्री. किशोर बडगुजर हे कंपनीत आहेत. ते पाच गांवाचे शक्ती केंद्र प्रमुख व धरणांगांव भारतीय जनता पार्टी चे कोषाध्यक्ष आहे. पिंप्री गावांतील समाज बांधव व इतर समाज बांधवांना शासकीय योजनेचा लाभ हा कसा घेता येईल व त्यासाठीही त्यांचा खुप मोलाची मदत होते.
श्री.सुनिल प्रल्हाद बडगुजर सर यांची जळगाव जिल्हा भाजप शिक्षक आघाडी जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली त्याबद्दल पिंप्री खु।।बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द तर्फे त्यांचा सत्कार गावातील जेष्ठ समाजबांधव ह.भ.प. श्री.देविदास बडगुजर यांच्या हस्ते गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी पिंप्री खु।।बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द चे मार्गदर्शक श्री.योगेश बडगुजर (भैय्या सर), सचिव निलेश बडगुजर, खजिनदार श्री.तुषार मोहकर , पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद मोहकर व ग्रामस्थ उपस्थित होते.श्री.सुनिल बडगुजर सरांना बडगुजर. इन टिम तर्फे भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
श्री. सुनिल बडगुजर- ७७९८४५४५३९
We are very proud of you sir. Your congratulations from the bottom of my heart