चाळीसगाव बडगुजर समाजाचे अध्यक्ष तसेच नागद. ता. कन्नड जि.औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत असणारे श्री शशिकांत वामन शेठ बडगुजर (कुसुंबेकर) ह. मु. चाळीसगाव यांची औरंगाबाद जिल्ह्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.

धुळे:कुसुंबेकर,ह.मु.चाळीसगांव येथील बडगुजर समाज अध्यक्ष श्री.शशिकांत वामन बडगुजर सर हे नागद, ता.कन्नड जिल्हा
औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत असून औरंगाबाद जिल्ह्यातून त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारा साठी निवड झाल्याची बातमी कळताच चाळीसगांव बडगुजर समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक ०४ सप्टेंबर शनिवार २०२१ रोजी श्री.शशिकांत सरांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले.

श्री. शशिकांत वामन बडगुजर अध्यक्ष, श्री.रमेश श्रीकृष्ण बडगुजर उपाध्यक्ष, श्री.संदीप चंद्रकांत बडगुजर सचिव चाळीसगांव बडगुजर समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व त्या प्रसंगी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती ओबीसी समितीचे मा.उपाध्याक्ष
श्री.एस्. एम्. बडगुजर (सर) यांच्याहस्ते सरांचा फुलहार, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

सर्व मान्यवरांनी सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी माता चामुंडा चरणी प्रार्थना! त्यांचे चाळीसगाव बडगुजर समाज मंडळ तसेच बडगुजर.इन वेबसाइट तर्फे हार्दिक अभिनंदन

शशिकांत सर मो.88055 26633.

Leave a Reply