शिरपूर ची सुन सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी रवाना – श्री. व्हि. डी. बडगुजर सर, शिरपूर

शिरपूर येथील श्री. राकेश विलासराव बडगुजर यांची धर्मपत्नी सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर अमेरिकेतील टेक्सास येथील नामांकित ए. ऍड. एम. युनिव्हर्सिटीत मास्टर ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग (M.S.) या उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून सौ. योगेश्वरी ने दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकेस मुंबई विमानतळावरून प्रयान केले.

सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर


सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर शिरपूर येथील सौ. अनिता व श्री विलासराव दंगल बडगुजर( सेवानिवृत्त मुख्याध्यापक के वी पी संस्था शिरपूर) यांची द्वितीय सून असून ,मुळगाव वर्षी ता. शिंदखेडा ह.मु.पलुस जि.सांगली येथील सौ. सुनिता व दिनेश मच्छिंद्र बडगुजर यांची जेष्ठ सुकन्या आहे. सौ. योगेश्वरी च्या आई वडिलांनी सांगितले की, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पलूस येथे झाले असून डिप्लोमा इन मेकॅनिकल चे शिक्षण सांगली येथे केले असून बी .ई.( मेकॅनिकल) पुणे येथील नामांकित कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.


सौ. योगेश्वरी ने लग्नानंतर उच्चशिक्षणाची अशी इच्छा व्यक्त केली की, माझे जेठ श्री .सागर विलासराव बडगुजर( M.Tech) व जेठाणी सौ. ऋतुजा सागर बडगुजर (BE. C- Dac )असून बेंगलोर येथे नामांकित कंपनीत दोघं सॉफ्टवेअर इंजिनियर तसेच माझे दीर चि. दीपेश विलासराव बडगुजर BE(I.T) इंजिनीयर पुणे येथे झाले आहेत. पतीदेव श्री.राकेश विलासराव बडगुजर मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स(M.S.) चे शिक्षण अमेरिकेत टेक्सास येथे पूर्ण करून टेक्सास येथेच नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून नोकरीला आहेत. या सर्वांचा आदर्श व मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून सौ. योगेश्वरी ने मनाशी निश्चय केला की, उच्चशिक्षित व्हावे म्हणून जिद्द चिकाटी व मेहनतीने” अशक्य चे शक्य” करून आपले स्वप्न साकार केल्याच्या आनंद सौ. योगेश्वरी ला झाला. सौ .योगेश्वरी ने आपल्या या सर्व यशामागे सासु-सासरे ,आई-वडील ,शिक्षक घरातील ज्येष्ठ मंडळी या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

सौ. योगेश्वरी व श्री. राकेश विलासराव बडगुजर, शिरपूर/अमेरिका


आपल्या बडगुजर समाजात लग्नानंतर स्त्रियांना क्वचितच समाज बांधव शिक्षणास परवानगी देतात. “स्त्रि- पुरुष समानता” यानुसार स्त्रियांनासुद्धा उच्चशिक्षित करून समाज गौरव शाली बनविला पाहिजे असे मला वाटते. शिक्षणासाठी आर्थिक खर्च तर लागतोच यासाठी आपल्या देशातील राष्ट्रीयीकृत बँका शैक्षणिक कर्ज म्हणून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे. असे मानून आपली स्वतःची व समाजाची शैक्षणिक ,आर्थिक प्रगती झपाट्याने होईल.
सौ. योगेश्वरी चे सासरकडील व माहेरकडील सर्व आप्तेष्ट व नातेवाईकांनी तसेच अनेक समाज बांधव व भगिनी,मैत्रिणी यांनी अभिमानाने कौतुक करून अमेरिकेस टेक्सास येथे उच्चशिक्षणासाठी आनंदाने शुभेच्छा देऊन रवाना केले.

सौ. योगेश्वरी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बडगुजर. इन टिमकडून त्यांना पुढील दैदिप्यमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर अमेरिकेत टेक्सास येथे प्रयाण, मुंबई विमानतळावर निरोप देतांना सासरे श्री. विलासराव दंगल बडगुजर दीर- दीपेश बडगुजर, दर्शन बडगुजर व भाऊ अक्षय बडगुजर

3 Comments

  1. * आमच्या सूनबाई चिं.सौ.योगेश्वरी राकेश बडगुजर ,

    ( शिरपूर ) ,
    * यांची एम.एस उच्च शिक्षणा साठी

    * अमेरिका विद्यापिठात निवड झालेल्या बध्दल व
    त्या साठी नुकतेच अमेरिकेत प्रयाण केल्या बध्दल

    * हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
    * यशस्वी भव : !

Leave a Reply to Ramesh Vamanrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*