सुरत येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री. मोहन वसंत शेठ बडगुजर यांनी आज दिनांक 20 /08/ 2021 रोजी जळगांव येथे कानळदा रोडवरील श्रीकृष्ण नगर या भागात “श्री चामुंडा प्लायवूड अँड लॅमिनेट” या होलसेल दुकानाचा शुभारंभ बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव चे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर व भुसावळ समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश शिवराम शेठ महाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

याप्रसंगी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव चे कार्यकारणी सदस्य श्री. राजेन्द्र दत्तात्रय पवार श्री. पी. डी. बडगुजर सर तसेच श्री. प्रदीप विश्वनाथ बडगुजर, कुऱ्हे येथील श्री.वसंत नामदेव बडगुजर, श्री.रामलाल बडगुजर, श्री. संजय पंढरीनाथ बडगुजर, श्री. विनोद हंसराज बडगुजर, भुसावळ येथील संजय शिवदास बडगुजर तसेच आपल्या बडगुजर समाजातील गणमान्य समाज बांधव हजर होते.

होलसेल भावात प्लायवूड, लॅमिनेट, बीटीसी पट्टी, अशाप्रकारचे भव्य शोरूम श्री. मोहन शेठ बडगुजर व त्यांचे चिरंजीव श्री.प्रशांत बडगुजर, श्री.राजू वसंत बडगुजर यांनी हे सुरू केले आहे. त्यांच्या या शुभारंभास बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव व बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ व बडगुजर.इन टिम तर्फे अनेक अनेक शुभकामना🌹🌹🌹🌹


Congratulations
Congratulations Mohan
congratulations