साकळी ह. मु. जळगांव येथील चि. दुर्गेश गुलाब बडगुजर याचे १२ वी मध्ये घवघवीत यश – श्री. हेमंत बडगुजर सर, जळगांव

साकळी ह. मु. जळगांव येथील कै. गुलाब मोतीराम बडगुजर यांचा मुलगा चि. दुर्गेश गुलाब बडगुजर यांचे १२ वी मध्ये घवघवीत यश संपादन केले. चि. दुर्गेश हा अगदी हुशार विद्यार्थी आहे. अगदी पहिली पासून ते बारावी पर्यंत ९० च्या वर मार्क मिळवित त्याने आपले सर्व वर्ग उत्तीर्ण केले आहेत. आपल्या अभ्यासक शैली आणि कलागुणांनी त्याने आपली एक वेगळाच ओळख तयार केली आहे. त्याने आपले प्राथमिक शिक्षण जळगांव येथील काशीनाथ पलोड स्कुल येथून घेतले. त्याला दहावी मध्ये ९३% मार्क भेटले. नंतर त्याने छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, जळगांव येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व १२ वी त ९४.३% गुण मिळवित हे यश संपादन केले.

यावर्षी जानेवारी २०२१ मध्ये चि. दुर्गेशच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे तो खुप खचला होता. नियतीने पितृक्षत्र हिरावून घेतले तेही ऐन बारवी च्या वर्षात. त्यात सर्वत्र कोरोना चा कहर आणि अभ्यासाची कास. चि. दुर्गेशच्या वडिलांचे स्वप्न होते की आपला मुलगा इंजिनिअर बनावा त्या अनुषंगाने चि. दुर्गेश हा आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मनपुर्वक अभ्यास करून बारावी मध्ये यश प्राप्त केले.

तंत्रज्ञान क्षेत्रात रूची असणाऱ्या दुर्गेश ला कॉम्प्युटर क्षेत्रात भरारी घ्यावयाची आहे. व त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. चि. दुर्गेशला या यशात आई योगिता बडगुजर व शिक्षकवर्ग तसेच समस्त नातेवाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. चि. दुर्गेश यास बडगुजर.इन टिम कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

2 Comments

  1. सुकुमार चि दुर्गेश बडगुजर,साकळी
    याचे अभिनंदन आणि शुभेच्छा! /

    डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

    • दुर्गेश बडगुजर चे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*