ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात चेतन बडगुजर याचा दहावीत प्रथम क्रमांक
पिंपळगाव हरेश्वर येथील मूळ रहिवासी व व्यवसायाने रिक्षाचालक असलेले श्री. सुनिल गंगाराम बडगुजर हल्ली मुक्काम जळगाव यांचा ज्येष्ठ चिरंजीव चेतन बडगुजर याने ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 93.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना. अत्यंत सामान्य कुटुंबातून त्याने हे यश संपादन केले आहे. कोरोणामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले. बंद पडले. त्यात रिक्षाचालकांची फार मोठे नुकसान झाले. हलाखीच्या परिस्थितीमुळे अँड्रॉइड मोबाईल विकत घेऊन ऑनलाइन शिक्षण करणे त्यांना अवघड होते. मात्र गुणवत्तेचे अस्तित्व लपून राहत नाही हे तेवढेच खरे आहे एटी झांबरे माध्यमिक विद्यालयाने होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध करून देण्याची योजना झांबरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी तसेच दीपस्तंभाचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी केलेली होती. त्याअंतर्गत चेतन यास अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध झाला. यामुळे त्याला पुढील अभ्यास करणे शक्य झाले.
उत्कृष्ट वकृत्व शैली च्या जोरावर चेतन याने अनेक वकृत्व स्पर्धांमध्ये यश संपादन करून ट्रॉफी प्राप्त केलेले आहेत. तसेच त्याला गायन आणि वादन या कला अवगत असल्यामुळे जळगांव शहरामध्ये होणाऱ्या शिवजयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याला पोवाडा सादर करण्यासाठी विशेष निमंत्रित केले जाते. यासाठी त्याचे अनेक आमदार-खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करून प्रशस्तिपत्रे दिलेली आहेत. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजेच एन एम एम एस या मध्ये सुद्धा त्याने शिष्यवृत्ती प्राप्त केली असून दरवर्षी त्याला सहा हजार रुपये इयत्ता बारावी पर्यंत मिळणार आहेत.

चेतनच्या या यशामध्ये ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप कुमार चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे मॅडम, तसेच मिलिंद सोनवणे संचालक रिद्धी सिद्धी क्लासेस तसेच इंग्रजी विषयासाठी प्रा. मिलिंद बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
कुठलेही शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती ही कधीच आड येत नसते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चेतन होय. आपल्या मध्ये असलेले कौशल्य गुण याची नेहमी इतरांना जाणीव करून दिल्यास प्रत्येक व्यक्ती आपणास मदत करायला तयार असतो. यामुळे आपल्या गरिबीची व कमकुवत आर्थिक परिस्थितीचा उदो उदो कधीच करू नये. भावी काळामध्ये एमपीएससी च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न आहे यासाठी त्याला आज पासून नवे आत्तापासूनच हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
चि.चेतनच्या या यशाला अखिल भारतीय बडगुजर समाज, युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व संपूर्ण बडगुजर समाजाच्या वतीने मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏 व भावी वाटचालीस अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा💐💐💐 यशस्वी भव ! शुभम भवतु!!!!!!

शब्दांकन प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर. ( 9421184495 )

Congratulations to Chetankumar & Keep it Score💐💐👌