दहावी बारावी नंतरचे उघडले दालन ऑनलाइन मागर्दर्शनात साडेतीनशेहून अधिक पालक, विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग


बडगुजर वेब पोर्टलचा कौतुकास्पद उपक्रम
Badgujar.In च्या माध्यमातून इयत्ता १० वी व १२ वीचे विद्यार्थी तसेच पालकांसाठी विशेष मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यास ३५० हुन अधिक समाजातील पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
मार्गदर्शनपर वेबिनारला प्राध्यापक डॉ. एन. एल. चव्हाण (फैजपूर,जळगाव) एम फिल,पी.एच.डी प्रमुख मार्गदर्शक लाभले. त्यांनी इ१०वी,१२ वी नंतरच्या विविध मार्गांची सखोल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन शाखांची माहिती देत त्यांना प्रेरित केले. तसेच पुणे येथील प्रा. सुदाम बडगुजर ( गणित तज्ञ) यांनी स्पर्धात्मक परीक्षा JEE, IIT, CET अशा विविध स्पर्धांची माहिती देत, त्यांची कशी तयारी करावी याविषयी मार्गदर्शन केले. ऑनलाईन वेबिनारची सुरुवात प्रा. प्रशांत बडगुजर (नाशिक),यांनी केली तर प्रास्ताविक लोकेश बडगुजर (जळगाव) यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. राजश्री बडगुजर (पुणे) यांनी केले. व आभार संदिप कोतवाल (नाशिक) यांनी मानले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन नियोजन अविनाश बडगुजर (मुंबई) यांनी केले. सामाजिक स्तरावर विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया देऊन आयोजकांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले. या कार्यक्रमास अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपचे सहकार्य लाभले.

समाजातील उभरते नेतृत्व श्री. दिलीप राघो बडगुजर यांनी पडद्यामागे राहून महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच प्रणव कोठवाल सर, दिनेश बडगुजर, दिपक बडगुजर, चंद्रकांत बडगुजर सर, विजय बडगुजर, धिरज बडगुजर, रविंद्र बडगुजर, विजय बडगुजर, मनिष बडगुजर, विनोद मोहकर, धर्मेश बडगुजर, हितेश मोहकर व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपच्या कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

डॉ. एन. एल. चव्हाण सर, प्रा. सुदाम बडगुजर सर, सुत्र संचालक सौ. राजश्री बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल, प्रा. प्रशांत बडगुजर, श्री. संदीप कोतवाल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*