पिंपळगांव हरेश्वर येथील चामुंडा माता मंदीर कार्य पुर्णत्वासाठी सरसावले समाजबांधव – श्री. बापु किसन बडगुजर, उद्योजक, मुंबई, श्री. रविंद्र त्र्यंबक बडगुजर, उद्योजक पुणे, श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, उद्योजक पुणे

दिनांक 25.07.2021 रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील चामुंडा माता मंदीर उभारणी विषयी समाजबांधवांनी मिटींग चे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पुणे येथील श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर व मुंबई येथील उद्योजक श्री. बापु किसन बडगुजर व पिंपळगांव हरेश्वर येथील श्री. किरण वसंत बडगुजर मा. अध्यक्ष, बडगुजर समाज, पिंपळगाव हरेश्वर व इतर पदाधिकारी, समाज बांधव यांच्या उपस्थितीत सदर सभेचे कोरोना नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते.

पिंपळगाव हरेश्वर गावातील चामुंडा मातेच्या मंदिराच्या बांधकामासाठी सभेस उपस्थित श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, पिंपळगांव हरेश्वर, (ह. मु. पुणे) यांनी रूपये 100000/- (रु एक लाख ) देणगी रोख स्वरूपात दिली.

श्री. बापू किसन बडगुजर पिंपळगांव हरेश्वर ( ह. मु. कल्याण) यांनी सदर चामुंडा मातेच्या मंदिराला संपूर्ण रंग रंगोटी च्या कामासाठी रुपये 1,11,000/- (रु एक लाख अकरा हजार ) ची देणगी दिली आहे.

तसेच पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र त्र्यंबक बडगुजर (पुणे) यांनी चामुंडा मातेची मूर्ती व दिशादेव यासाठी रुपये 1,21,000/- ( ₹ एक लाख एकवीस हजार) ची देणगी दिली आहे.

सदर देणगीदार यांचे माँ चामुंडा माता बहुउद्देशीय संस्था, पिंपळगाव हरेश्वर यांच्या तर्फे हार्दिक आभार मानण्यात आले. तसेच ज्या समाजबांधवांना मंदिर उभारणी साठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी मॉं चामुंडा माता बहुउद्देशीय संस्था, पिंपळगांव यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी पदाधिकारी यांचेतर्फे करण्यात आली.

सभेस उपस्थित मान्यवर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*