कला अनंत सोसायटी, उत्तराखंड आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शिरपूर येथील डॉ. अतुल साहेबराव बडगुजर यांचा चि. तनिष्क अतुल बडगुजर देशात प्रथम – श्री. रविंद्र दयाराम बडगुजर, शिरपूर

उत्तराखंड च्या डेहराडदूनमधील कला अनंत सोसायटी तर्फे नुकतीच चित्रकला स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेत शिरपुर येथील तनिष्क बडगुजर याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. चि. तनिष्क हा शिरपूर शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध डॉ. अतुल बडगुजर व डॉ. सौ. वृषाली बडगुजर यांचे सुपुत्र आहे. चि. तनिष्क अतुल बडगुजर याने या राष्ट्रीय स्पर्धेत सी गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

चि. तनिष्क हा अतिशय हुशार विद्यार्थी असून शालेय शिक्षणात सुध्दा असेच यश संपादन करीत असतो. शिक्षणासोबतच त्याला चित्रकलेची देखील आवड आहे. विविध कलागुणांनी संपन्न असा कलाकार आहे. अगदी कमी वयात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणे हे आपल्या आई वडिलांच्या सहकार्य मार्गदर्शनामुळे त्याला प्रेरणा मिळते. असे तो यश संपादन केल्यानंतर बडगुजर. इन ला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले.

त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे बडगुजर. इन टिम, युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप कडून चि. तनिष्क चे तसेच डॉ. सौ. वृषाली व डॉ. अतुल बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील दैदिप्यमान यशकिर्तीसाठी शुभेच्छा.

2 Comments

  1. हार्दिक अभिनंदन तनिष्क.भावी वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  2. चिं.तनिष्क अतुल बडगुजर ( शिरपूर )
    याने मिळविलेल्या सुयशा बध्दल ,
    हार्दिक अभिनंदन !

Leave a Reply

Your email address will not be published.


*