डेन्व्हर, कोलोरॅडो-अमेरिका स्थित दाम्पत्य श्री.मोहनदास देविदास पालटशा आणि सौ. चेतना मोहनदास पालटशा (बडगुजर) आणि
ज्ञानेश मोहनदास पालटशा यांनी कोविंद १९ काळात कुटीर रुग्णालय पारोळा यांस थ्री पॅरामीटर मशिन भेट दिली. जेणे करून त्याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होऊ शकेल. या दाम्पत्यांकडून पारोळा कुटीर रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारे पहीलीच भेट वस्तू देण्यात आली. असे कुटीर रुग्णालयाच्या सूत्रांकडून कळविण्यात आले.

श्री.मोहनदास देविदास पालटशा हे पारोळा येथील सौ.कल्पना देविदास बडगुजर व प्रा.श्री.देविदास अभिमन बडगुजर( सेवा निवृत्ती सहयोगी) प्राध्यापक किसान महाविद्यालय पारोळा, यांचे चिरंजीव तसेच प्रा.श्री.विक्रांत देविदास पालटशा ( सहाय्यक प्रा.श्री सिद्धि विनायक महीला महाविद्यालय कर्वेनगर, पुणे) व श्री.नयन देविदास पालटशा (ह्युरॉन आय. टी. लि. सिनिअर कन्सलटन्ट पुणे) यांचे बंधू आहेत.
मोहनदास पालटशा हे लहानपणा पासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांनी सर्व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य पातळीवर तसेच नवोदय व सैनिकी स्कूल सातारा यातही गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले. इ.१० वीत ८८% गुण आणि १२ वीत ८९% गुण मिळविले आहेत. लोणेर येथून स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. टेक. ( इलेक्ट्रिकल) ही पदवी गोल्ड मेडल सह प्राप्त केली आहे. शिक्षण घेत असतांंना तिसऱ्या वर्षी टी.सी. एस.या कंपनीत कॅम्पस सिलेक्शन झाले.
टी.सी.एस.या कंपनीत रूजू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच लाॅस एंजिलस अमेरिका येथे जाण्याची संधी मिळाली. नंतर.टी.सी.एस.या कंपनी कडूनच दक्षिण अमेरिका क्विटो इक्वाडोर येथे जवळपास तीन वर्ष सेवेची संधी मिळाली. क्विटो इक्वाडोरला असतांना दक्षिण अमेरिकेतील बऱ्याच देशांना भेटी देता आल्यात व भारतात आल्यावर इन्फोसिस या कंपनीत रुजू झाले नोकरी करीत असतांंना बिट्स (B.I.T.S) पिलानी राजस्थान येथून एम्.टेक.(इन्फारमेशन सिस्टम) येथे पदव्युत्तर शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण केले. इ.स.२०१७ पासून डेन्व्हर कोलोरॅडो -अमेरिका येथे इन्फोसिस या कंपनीत कार्यरत असून सेवा बजावत असतांना त्यांनी एम् एस् (डेटा सायंटिस्ट) पूर्ण केले.
आता सध्या ते इन्फोसिस या कंपनीत डेटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहेत. त्यांना इन्फोसिस कंपनीकडून २०२० चा ग्लोबल लेव्हलचा “मोस्ट व्हॅल्यूयबल प्लेअर” हा पुरस्कार जानेवारी २०२१ ला मिळाला. तसेच त्यांचे मोठे बंधू प्रा विक्रांत देविदास पालटशा यांना ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “बेस्ट काॅलेज कोड्रीनेटर”
हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुणे विद्यापीठाने अलीकडेच बहाल केला.

मोहनदास पालटशा यांच्या सुविद्य पत्नी सौ. चेतना मोहनदास पालटशा या सुध्दा बी. ई. (काॅम्युटर) आहेत.त्यांना ज्ञानेश हा पाच वर्षाचा मुलगा असून तो अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे त्याच्या कार्यात या दोघांचे पूर्णता सहयोग मिळत असतो. मोहनदास पालटशा यांनी भेट दिलेली थ्री पॅरामीटर मशीन प्रा.देविदास अभिमन बडगुजर, प्रा.खुशाल फकिरा करस्कर आणि श्री.नयन देविदास पालटशा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बी.साळुंखे यांच्या कडे सुपुर्द केले. या वेळी कुटीर रुग्णालयाचा सर्व स्टाफ हजर होता.


Leave a Reply